पालम तालूका शैक्षणिक पॅटर्न तयार करावा.... गटशिक्षणाधिकारी शिवाजी गायकवाड
पालम प्रतीनिधी:- शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०खुप अशा सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. व राज्यात सी बी एस ई (CBSE) पॅटर्न या वर्षी प पहीली पासून राबविण्यात येणार असे जाहीर केल्याने त्या प्रमाणे नविन पाठ्यपुस्तक निर्मीती होत आहे. पालम तालुक्यातील सर्व शाळा व त्यातील शिक्षक एकापेक्षा उपक्रमशील,शासनाचे व नवनवीन उपक्रम राबवित असतात. शासन सर्व शाळेत सर्व मुलभूत व भौतिक सुविधा व सर्व योजना पोहचवून प्रत्येक शाळेची व प्रत्येक विद्यार्थी यांची गुणवत्ता वाढवून महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण दर्जेदार करण्यासाठी तयारीत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगीनीनी या पुढे ही प्रत्येक शाळेवर गुणवत्ता वाढीसाठी असेच सकारात्मक तन मन धनाने प्रयत्न केल्यास नक्कीच आपला पालम तालूका परभणी जिल्ह्यात गुणवत्तेत पहीला नंबर येईल.व आपला पालम तालूका लातूर, नांदेड सारखा एक आदर्श शैक्षणिक पॅटर्न तयार होईल या साठी सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समीत्या, विषय तज्ञ व सर्व संबंधित या सर्वांनी आपला खारीचा वाटा उचलावा यात तिळमात्र शंका नाही. असे जाहीर आवाहन मा श्री शिवाजी गायकवाड गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पालम यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडी केंद्र चाटोरी येथे दि ०४/०४/२०२५ रोजी इयत्ता पहीली प्रवेश सोहळा, इयत्ता सातवी विद्यार्थी यांना निरोप देताना, सांस्कृतिक कार्यक्रम बक्षीस वितरण व प्रा शा खडी पाचवीचा समर्थ सचिन बरूरे हा येथील व केंद्रातील नवोदय प्रवेश पात्र विद्यार्थी, पालक, आदर्श शिक्षक यांचा सत्कार समारंभात केले.
यावेळी इयत्ता पहीली प्रवेश पात्र मुलांना प्रवेश देवून त्यांना विविध शैक्षणिक साहित्य देवून पालकांसह सत्कार, नवोदय विद्यालय पात्र विद्यार्थी पालक, मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार करून त्यांना व शाळेतील विद्यार्थ्यांना पालकांना आपल्या भावी आयुष्यासाठी अभ्यासात जास्तीचा वेळ देवून समाजात आपले स्थान निर्माण करून आपल्या कुटुंब, गाव, व देशासाठी काम करण्यास सज्ज रहावे करीता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक मा गटशिक्षणाधिकारी शिवाजी गायकवाड,चाटोरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री राम चाटे, केंद्रप्रमुख श्री त्र्यंबक ब्याळे,जि प प्रा शा खडी चे मुख्याध्यापक श्री गोविंद बिलापट्टे,तालूका विषय तज्ञ मार्गदर्शक साधन व्यक्ती श्री तत्तापुरे सर,श्री सुकेश आलापुरे, श्री हराळे सर, श्री मद्दे सर,,श्री गित्ते सर यांनी विषयवार मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थी यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रबद्ध आयोजन, नियोजन जि प प्रा शा खडी चे मुख्याध्यापक श्री गोविंद बिलापट्टे ,आदर्श शिक्षक श्री साकोळे सर, श्री दांडगे , श्री लांडगे, श्री खतगावकर सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केले होते. तर या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री साकोळे सरांनी केले होते. या कार्यक्रमाला गावातील उपसरपंचश्रीरामचंद्र निळे, श्री देवीदास मादरपल्ले ग्रा पं सदस्य, शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष श्री सुनिल एंगडे, पोलीस पाटील श्री प्रकाश एंगडे व पदाधिकारी नामदेव बरूरे, सुधाकर बरूरे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री तुकाराम निळे गावातील पालक श्री सचिन बरूरे , शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे शाळेत व गावात एक नवीन शैक्षणिक वातावरण निर्माण होऊन सर्व विद्यार्थी यांच्या मध्ये एक नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.




0 टिप्पण्या