प्रशांत माळवदे यांचा शाल, फेटा, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून गौरव,

प्रशांत माळवदे यांचा शाल, फेटा, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून गौरव,

सांगोला प्रतिनिधी :- सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘पत्रकार कृतज्ञता सन्मान सोहळा’ उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे पत्रकार प्रशांत माळवदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

प्रशांत माळवदे यांना शाल, फेटा, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाहक धनाजी चव्हाण, ड्रीम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी तसेच कारंडे इंटरनॅशनल स्कूलचे निमंत्रक श्रीधर कारंडे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी यांनी, पत्रकारिता हे समाजातील विविध घडामोडी लोकांपर्यंत पोहोचविणारे महत्त्वपूर्ण माध्यम असून, पत्रकारांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला सांगोला परिसरातील पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या पत्रकार कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे उपस्थितांनी कौतुक केले.

पत्रकार प्रशांत माळवदे यांना पत्रकार कृतज्ञता सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या