गंगाखेड रस्त्यावर मालेवाडी जवळील घटनाआजोबालासह दवाखान्यात जात असतांना दुचाकी वरील अजोबासह नातवाचा जागीच मृत्यू


गंगाखेड रस्त्यावर मालेवाडी जवळील घटना
आजोबालासह दवाखान्यात जात असतांना दुचाकी वरील अजोबासह नातवाचा जागीच मृत्यू 
पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव 
 
गंगाखेड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर राव राजुर मर्डसगाव मार्गे गंगाखेड येथे येणारी मोटरसायकल व कळंब नांदेड या बसचा समोरासमोर अपघात झाल्याने मोटार सायकल वर असणारे आजोबा व नातवाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 25 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली आहे.
  दि.25 फेब्रुवारी शनिवार रोजी पालम तालुक्यातील रावराजुर येथील शिवाजी किसनराव शिंदे वय 75 यांना दवाखान्यात उपचारासाठी नातू श्रीनिवास कल्याणराव शिंदे वय 19 हा मोटरसायकल वर गंगाखेड येथे घेऊन जात असताना कळंब नांदेड ही बस गंगाखेड वरून पालम कडे जात असताना मोटर सायकल असणारे दोघेजण बसच्या उजव्या चाकाखाली आल्याने अपघातात मृत्यू झाल्याची घटना सकाळी 9:30 ते 9:45 दरम्यान घडली आहे. 
अपघाताची माहिती मिळताच गंगाखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर पोलीस उपनिरीक्षक बुधोडकर यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे घटनास्थळावरून दोन्ही मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात सेवाविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात  नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत होती. दरम्यान झालेल्या अपघातात आजोबा नातू यांचा मृत्यू झाल्याने पालम तालुक्यातील रावराजुर गावावर शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या