वाडी-तांड्यावर भाजप पोहोचविणाऱ्या देवीदास भाऊ राठोडांना न्याय कधी मिळणार ?
दशरथ राठोड परभणी जिल्हा संयोजक तथा मराठवाडा युवा अध्यक्ष बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाजाचा सवाल!
गंगाखेड प्रतिनिधी :- गेल्या 30 वर्षापासून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र बाहेरील बंजारा समाजात प्रभावीपणे भाजपाचा विचार पोहोचविणाऱ्या आणि सदैव भाजप पक्ष विस्तारासाठी कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील बंजारा समाजातील एक प्रमुख लोकनेते म्हणून ओळख असलेल्या देविदास भाऊ राठोडांच्या कामाची अजूनही भाजप पक्ष श्रेष्ठींनी म्हणावी तेवढी दखल घेतलेली नाही. या उमद्या समाज नेतृत्वास भाजपात कधी न्याय मिळणार असा सवाल राज्यभरातील बंजारा समाजातील कार्यकर्त्याकडून विचारला जात आहे.
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी विविध जाती धर्मातील तरुणांना भाजपच्या माध्यमातून राजकारणात पुढे येण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन दिले त्यापैकी एक देविदास भाऊ राठोड हेही मुंडे साहेबांचे पाठबळ व मार्गदर्शनाखाली देविदासभाऊ नी राज्यभरात अनेक सामाजिक व राजकीय कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले तो काळ असा होता की बंजारा समाज भाजपापासून कोसो दूर होता.त्यामुळे भाजपाचे विचार वाडी- तांड्यावर घेऊन जाताना अनेक अडचणी आल्या परंतु देविदास भाऊंचा संघर्ष सुरूच राहिला. आज राज्यातील आणि आसपासच्या वाडी तांडात भाजप विचारांच्या कार्यकर्त्यांची चांगली सक्षम फळी निर्माण झाले आहे त्याचे सर्वाधिक श्रेय कुणाचे असेल तर ते देविदास राठोडांचे.
देविदास भाऊ राठोड यांची अनेक आंदोलने महाराष्ट्र भर चर्चेली गेली त्यांनी परभणी कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी काढलेला पोंगा मोर्चा बंजारा समाजात स्वतंत्रपणे आरक्षण देण्याचा मागणीसाठी आंदोलन ही काही आंदोलने विशेष गाजली. तांडा वस्ती सुधार योजनेची निर्मिती आणि अमलबजावणी त्यांचा सदैव पुढाकार राहिला आहे. नांदेड येथे झालेल्या गुरुता गदी कार्यक्रमाच्या धरतीवर पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा हे त्यांची आग्रही मागणी होती. आणि ती सातत्याने लावून धरले. 300 पेक्षा अधिक लोकवस्तीची बंजारा गावे व तांडाना महसुली गावांचा दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत कराव्यात, ऊसतोड मजुरांना मजुरीवाढ व आवश्यक सुविधा देण्यात याव्यात त्यांच्या मुला-मुलींना शिक्षणाची सोय करावी. वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळास पुरेशा निधी उपलब्ध करून देऊन भटक्या विमुक्त जाती जमातीतील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले आहेत. ख्रिश्चन मिशनरींकडून बंजारा समाजात धर्मांतरासाठी केला जाणारा प्रयत्न हाणून पाहण्यासाठी समाजात जागृती निर्माण करण्यात देविदासभाऊ यांचा मोठा वाटा राहिला आहे. अलीकडे पोहरादेवी येथे झालेल्या नांगारा वास्तु भूमीपूजन कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी महाराष्ट्रात काढलेले नंगारा संवाद यात्रा खूप चर्चिला गेला आणि त्या माध्यमातून अनेक तरुण कार्यकर्ते भाजपाशी जोडले गेले. पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पंतप्रधान अटलजी पासून ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजाचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. कोरोना लोगडाऊन च्या काळात स्वस्त न बसता समाजाच्या विविध अडचणीच्या प्रसंगी सतत मदतीची भूमिका त्याची राहिली आहे.
दादा इदाते यांच्या खांद्याला खांदा लावून राजातील भटके विमुक्त त्यांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी ते अहोरात्र कार्यरत आहेत. अशा सतत संघर्षाच्या भूमिकेत राहून बंजारा समाजात भाजपा विस्तारा साठी सतत कार्यरत असणाऱ्या देविदास भाऊ राठोड यांना 2014 साली राज्यात भाजपाचे सरकार आल्यावर न्याय मिळेल महत्त्वाचे पद अथवा चांगली जबाबदारी त्यांच्यावर सोपीवली जाईल अशी अपेक्षा बंजारा समाज व त्यांच्या कार्यकर्त्यांना होती परंतु अध्यापही सुदिग्न उगवलेला नाही. अशा स्थितीत भाजप देविदास भाऊ राठोड यांना कधी न्याय देणार हा प्रश्न कायम असुन आता समाजात तो प्रकर्षाने विचारला जात आहे.
0 टिप्पण्या