चापोली जिल्हा परिषद मतदारसंघात विकासाची गंगा आणनार.सज्जन लोणाळे
चापोली मतदारसंघात धनशक्ती विरूद्ध जनशक्ती ची लढाई यशस्वी होणार.
प्रतिनिधी चाकूर :- चाकुर तालूक्यातील चापोली जिल्हा परिषद गटात भाजपा च्या सौ सुमनबाई रामदास लोणाळे या चाकूर पंचायत समीती चे कार्यतत्पर,कर्तव्यदक्ष माजी उपसभापती श्री. सज्जन रामदास लोणाळे यांच्या मातोश्री तर अजनसोंडा (बुजरुख)पंचायत समिती गणातून सौ. लता बालाजी राठोड आणि चापोली पंचायत समिती गणातून श्री. काशिनाथ मन्मथ व्होनराव (लातूरे)हे भारतीय जनता पार्टी चे अधिकृत उमेदवार म्हणून कमळ या जिन्हावर निवडणूक लढवत आहेत.या तिनही जागेवर भारतीय जनता पार्टी चा झेंडा लागणार ही "काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे"अशी चर्चा संपूर्ण चापोली सर्कल मध्ये जनतेतून होताना दिसत आहे.*
*याच चापोली जिल्हा परिषद मतदारसंघातून नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ चापोली चे सचिव तथा संजीवनी महाविद्यालय चे बोगस कागदपत्रे लावुन झालेले उपप्राचार्य आणि चापोली चे नापास झालेले सरपंच भालचंद्र नारायण चाटे यांच्या पत्नी सौ रंजना भालचंद्र चाटे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून निवडणूकीस उभ्या आहेत. ह्या सौ रंजना चाटे ह्या उदय प्राथमीक विद्यालय उदगीर येथे नोकरीस आहेत.ह्या एकही दिवस शाळेत न जाता अनेक वर्षांपासून पगारी उचलून जनता, विद्यार्थी,पालक यांची दिवसाढवळ्या दिशाभूल व फसवणूक करून त्या मी नोकरीस आहे असे खोटे रेकॉर्ड व कोणामार्फत ही बनावट सह्या करून पगार घेवून शासन व जनतेची लूट करत आहेत.ह्या आपल्या परीवारातील काळा पैसा व धनशक्ती च्या जोरावर निवडणूक लढवत आहेत.*
*भालचंद्र चाटे हे गेल्या तीन वर्षांपासून चापोली गावाचे सरपंच आहेत.हे व यांचे वडील तसेच परीवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे पदाधिकारी होते.यांच्या संस्थेचे अनेक घोटाळे व अनेक महाभ्रष्टाचार गावकरी यांच्या तक्रारीवरून चौकशा चालू आहेत व काही प्रकरणे सर्व कोर्टात चालू आहेत.त्यामुळे यांना वाचवायला कोणी नसल्याने यांना या महाघोटाळे पासून आता कोणीही वाचवू शकत नाही करीता यांनी आम्हाला वाचवा म्हणून सहकार मंत्री यांचा आसरा घेतलाआहे .व भालचंद्र चाटे यांची आणखी दोन वर्षे सरपंचकी शिल्लक राहीलेली असताना ही लगेच आपल्या पत्नी रंजना भालचंद्र चाटे यांना जि प चापोली सर्कल साठी उभे करून सरपंचकी,पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य व नेते मंडळी यांच्या माध्यमातून आपल्या सर्व चौकशा थांबवून त्यावर पांघरूण घालण्यासाठी हा निवडणुकीचा अट्टहास आहे.स्वताला कुणाची व जनतेच्या प्रश्नांची जाणीव नसल्याने यांनी मागील कार्यकाळात चापोली गाव विकासापासून 15 वर्ष मागे घातले आहे.चापोली सर्कल मधील एकाही गावात यांची ओळख नाही व कुणाचे काम अडचन यांनी सोडवली नाही. फक्त काळ्या पैशाच्या जोरावर आम्ही काहीही करू शकतो गुर्मीत राहून आपल्या संस्थेचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी,विद्यार्थी यांना जबरदस्तीने कपडे टी शर्ट,कॅलेंडर वाटणे, मतदारांच्या पैसा वाटप करणे साठी याद्या करणे,विद्यार्थी व कर्मचारी यांचे मार्फत दारूचे ही वाटप करणे अशी कामे चापोली सर्कल मध्ये चालू केलेली आहेत.तसेच श्री चाटे जूण्या कामाचे व आमदार, खासदार व इतर माध्यमातून गावकरी यांनी आनलेल्या कामाचे फोटो काढून एक पुस्तकही काढले आहे.आम्ही एवढे कामे केले म्हणून ही पुस्तके सर्कल मध्ये कर्मचारी कडून वाटप करत आहेत. हे सर्व खोटे आहे..कोणती कामे केली त्याची पुरावे दाखवा म्हणून याचा जाब जनता भर कार्यक्रमात विचारणार आहेच.हे सर्व पहाता जनता यांचे कडून पाठ फिरवताना दिसत आहे.*
*श्री चाटे यांनी गावातील सरकारी सकस आहार ची एक हेक्टर 40आर जमीन व ग्रा पं चापोली मालकीची विकत घेतलेली गट नंबर 244मधील 36 आर जमीन आणि खाजगी शेतकरी यांची 06एकर जमीन व स्वतःचे तीन कोटी चे घरही सार्वजनिक रस्त्यावर बांधले आहे.प्राचार्य व उपप्राचार्य दोघेही बनावट कागदपत्रे लावुन नोकरीस लागले आहेत.हे संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक,कर्मचारी यांची लूट करत आहेत. शेतकरी यांना सावकारीतून पैसा देवून त्याच्या जमीन लूटत आहेत. सरकारी, खाजगी, व सार्वजनिक जमीनीवर अनेक अतिक्रमण करत आहेत यांच्या ही चौकशा चालूच आहेत.अशी अनेक महाघोटाळे करून ही मी पवित्रच आहे "मी नाही त्यातली आणि.....असे म्हणत सर्वांची दिशाभूल करत आपल्या पत्नीला निवडणूकीस उभा करून सर्व पदे आपली काळे धंदे झाकण्यासाठी आपल्या कडेच रहावे व आपल्या विरोधात कोणी निवडून येवून आपला काळाबाजार उघड करू नये म्हणून ही निवडणूक लढवत आहेत.*
जिल्हा परिषद चापोली सर्कल मधून सौ सुमनबाई रामदास लोणाळे तर चापोली पं समीती गणातून श्री काशिनाथ मन्मथाप्पा व्होनराव (लातूरे) तसेच अजनसोंडा पं समीती गणातून सौ लता बालाजी राठोड ह्या निवडणूक लढवत आहेत.हे तीनही उमेदवार स्वच्छ चारित्र्य, गरीबांना मदत करणारे, जनतेच्या मनातील उमेदवार आणि मतदारांच्या सर्व प्रश्नांची जान असणारे लोकांचे मदतकर्ते आहेत म्हणून सर्व समाज,आजी माजी पदाधिकारी,सर्व गट तट,महीला,युवा तरून वर्ग विद्यार्थी मोठय़ा ताकदीने यांच्यासोबत आहे.म्हणून यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतली आहेअसे चित्र सध्या दिसत आहे.जि प सर्कल चापोली भाजपा च्या उमेदवार सौ. सुमनबाई लोनाळे यांचे चिरंजीव श्री सज्जन भैया लोणाळे हे उच्च शिक्षित असून मागील पंचवार्षिक मध्ये चाकूर पंचायत समिती चे उपसभापती होते यांनी आपल्या कार्यकाळात सर्व समाज व जनतेची अफाट कामे केली आहेत.तसेच चापोली गणातील पं समीती चे उमेदवार श्री काशिनाथ मन्मथाप्पा व्होनराव (लातुरे) हे पण मतदारसंघात चापोली गणात सर्वाधिक परीचयाचे व उच्च शिक्षण घेतलेले 24 तास जनतेच्या संपर्कात राहून सर्व स्तरातील जनतेच्या अडिअडचणी सोडविणारे असल्याने यांचा ही विजय आजच निश्चित मानला जात आहे.आणि पंचायत समिती आजनसोंडा गणातुन सर्वांचा परीचय असणारे पुणे येथे कन्स्ट्रक्शन व्यवसायात असनारे श्री बालाजीराव राठोड यांच्या पत्नी सौ लता बालाजी राठोड या निवडणुक लढवत आहेत.यांचाही जनसंपर्क मोठा आहे हे पण सर्व ताकदीने निवडणूक लढवत आहेत.या तीनही स्वच्छ कारभार,निरंतर काम करण्याचा वसा व हे सर्व गुण संपन्न आणि जनतेच्या सर्व प्रश्नांची जाण असलेले उमेदवार म्हणून आज सर्व स्तरातील जनता, लाडकी बहीन,युवा वर्ग, महीला भगीनी,आणि सर्व समाजबांधव व जनता वाढता पाठींबा देत आहेत.यामुळे यांना सध्या सर्वत्र सर्व गावागावातून बिनशर्थ प्रतिसाद मिळत आहे.वरील ही तीनही उमेदवार चापोली सर्कल मधून प्रचंड बहुमताने विजयी होणार असा ही सूर सर्वत्र पहायला मिळत आहे.*
*प्रतीनिधी शी बोलताना माजी उपसभापती श्री सज्जन भैया लोनाळे यांनी बोलताना सांगितले की आपल्या मातोश्री यांच्या व श्री काशिनाथ व्होनराव,सौ लता राठोड यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी च्या केंद्र आणि राज्यात असलेल्या सरकारचा लाभ घेवून सर्व जनतेचे प्रश्न सोडवून चापोली मतदारसंघाचा कायापालट करून अनेक वर्षांपासून राहीलेला विकास कामांचा अनुशेष भरून काढून येथे विकासाची गंगा आननार आहे. तरुणांना व सुशिक्षित बेकारांना,महीला, शेतकरी यांना मदत करून,चापोली व इतर ठिकाणी व्यापारांस चालना देवून त्यांना मदत करणार, जनतेच्या शास नाकडून चालू असलेल्या सर्व योजना प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक मदत केंद्र उघडून 24 तास मदत करणार असे अभिवचन आपल्या मातोश्री यांच्या साक्षीने दिले.पुढे श्री काशिनाथ लातूरे चापोली पंचायत समिती उमेदवार यांनी मी पण माझा परीवार सांभाळून माझे उर्वरित आयुष्य जनतेच्या सेवेसाठीच खर्ची करणार असा शब्द दिला. नक्कीच श्री सज्जन लोनाळे, श्री काशिनाथ लातुरे यांच्या कर्तव्यदक्ष,कर्तबगारीचा, व अभ्यासपूर्ण जनसंपर्काचा चापोली जि. प.सर्कल विकासासाठी नक्कीच फायदा होणार व आपला चापोली मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् होणार,आपली सर्व प्रश्न व अडीअडचणी सोडविणार म्हणून भारतीय जनता पार्टी च्याच तीनही उमेदवार यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणनार अशीही चर्चा सर्वत्र पहायला मिळत आहे.



0 टिप्पण्या