जिल्हा परिषद शिक्षकांची लॉज मध्ये गळफास लावून केली आत्महत्या

जिल्हा परिषद शिक्षकांची लॉज मध्ये गळफास लावून केली आत्महत्या.
परभणी शहरातील वसमत रोडवरील घटना

आत्महत्येचे नेमके कारण अजून गुलदस्त्यातच

परभणी जिल्हा प्रतिनिधी :-  शहरातील वसमत रोडवरील एका लॉजवर एका ४२ वर्षं वयाच्या शिक्षकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

ही घटना दिनांक १८ फेब्रुवारी शेणिवार रोजी, दुपारी २.३० वाजता उघडकीस आली, आत्महत्या केलेला इसम दैठणा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असल्याची माहिती मिळाली आहे.अत्महत्येचे नेमके कारण काय हे मात्र अद्याप समजलेले नाही.

या घटनेची नवा मोंढा पोलिस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, अनंत गिरजाप्पा मुलगीर वय ४२ वर्षं, राहणार शेळगाव तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी, असे मयताचे नाव आहे.

अनंत गिरजाप्पा मुलगीर यांनी वसमत रोडवरील एका लॉजवर रूम किरायाने घेतली होती.शेनिवारी दुपारच्या सुमारास, लॉजवरील कर्मचारी, पाण्याची टाकी भरली आहे का नाही, पहाण्यासाठी गेला असता,खोलीची एक खिडकी उघडी दिसली, आतमध्ये अनंत गिरजाप्पा मुलगीर यांनी गळफास घेतल्याचे दिसून आल्याने, लॉजवरील कर्मचाऱ्यांने हि माहिती लॉज मालकाला कळवली असता, लॉज मालकाने तात्काळ नवा मोंढा पोलीसांना महिती दिली, पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार, सहायक पोलिस निरीक्षक बेले, पोलिस हेड कॉन्स्टेबल आर.एस.मुंढे, पोलिस नायक एन.बी.घरजाळे, यांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा करून, मृतदेह ताब्यात घेतला व शेवविछदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.

अनंत गिरजाप्पा मुलगीर हे जिल्हा परिषद शाळा दैठणा येथे शिक्षक होते, त्यांनी आत्महत्या का केली हे मात्र अद्याप समजलेले नाही.मागील काही दिवसांपासून,ते परिवारासह वैभव नगर येथे किरायाने राहत होते, अनंत मुलगीर यांच्या मोठ्या भावाने देखील, काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती, अशी माहिती मिळाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या