व्हॉईस ऑफ मीडिया अर्थात व्हीओएम इंटरनॅशनल फोरम, महाराष्ट्रच्या वतीने परभणी येथे महत्त्वपूर्ण मेळाव्याचे आयोजन

 व्हॉईस ऑफ मीडिया अर्थात व्हीओएम इंटरनॅशनल फोरम, महाराष्ट्रच्या वतीने परभणी येथे महत्त्वपूर्ण मेळाव्याचे आयोजन



पालम प्रतिनिधी :- पत्रकार बांधवांच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया अर्थात व्हीओएम इंटरनॅशनल फोरम, महाराष्ट्रच्या वतीने परभणी येथे महत्त्वपूर्ण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.परभणीला मी येतोय.आपण पण या! असा संदेश देत व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्रचे राज्य प्रसिद्धी प्रमुख बापूराव ठाकरे यांनी पत्रकार बांधवांना,उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, पत्रकारांच्या हक्क आणि समस्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच, 

भविष्यातील दिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.हा मेळावा रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता, रेणुका मंगल कार्यालय, पाथरी रोड, परभणी येथे होणार आहे.एकजूट, विश्वास आणि जबाबदारी,या ब्रीदवाक्या खाली आयोजित,

या कार्यक्रमात राज्यभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आयोजकांनी आव्हान केले आहे.पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि, समाजहितासाठी कार्यरत असलेल्या या उपक्रमात सहभागी होऊन संघटनात्मक एकजूट अधिक बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या