उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खाजगी गाडीला लावला लाल दिवा.

उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी  खाजगी गाडीला लावला लाल दिवा.

तुळजापूर प्रतिनिधी :- उपविभागीय अधिकारी हे सध्या संशयाच्या भवऱ्यात सापडले असुन यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या खाजगी गाडीला लाल दिवा लावून स्वतःच्या आर्थिक कामासाठी फिरत असल्याबाबत सदर सीसीटीव्ही तपासणी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिनांक 21 जून रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे .
       
 या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की दिंनाक 16 जुन रोजी
 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीसहे
तुळजापूर दौऱ्यावर आले होते. साधारणतः २.१० वाजण्याच्या सुमारास तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्यावेळी उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे ही उपस्थित होते. सदर योगेश खरमाटे हे त्याच्या नातेवाईकांच्या नावे असलेली चारचाकी
स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक MH ११ AK 9299 या नंबरच्या कारने (गाडीने) तुळजाभवानी मंदिर रोडवरील दिपक गेट जवळ सदर पांढऱ्या कलरचे वाहना वरती लाल कलरचा दिवा असल्याचे आढळुन आले. तसेच त्या वाहनाची
माहिती घेतली असता त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असल्याचे दिसुन आले. तसेच सदर वाहनाचा इन्शुरन्स हा कालबाह्य झाल्याचे दिसुन आले. लाल दिवा हा केंद्र शासनाने १ मे २०१७ पासुन सर्व वाहनांवरील बंद केला असुन सुध्दा उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या खाजगी गाडीला लाल दिवा लावुन शासनाची व अधिकाऱ्यांची फसवणुक
केली आहे. तरी सदर १६ जुन रोजीचे दिपक चौक येथील सदर वाहनाचे CCTV फुटेज पाहुन चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर
योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात यावा असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील,यांची स्वाक्षरी आहे .
           जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केल्यामुळे जिल्हाधिकारी याप्रकरणी काय कारवाई करणार? अत्यावश्यक सेवा नसतानाही नातेवाईकांच्या नावे लाल दिवा लावून फिरणारी उपविभागीय अधिकारी यांच्यावर काय कारवाई होणार याकडे संपुर्ण जिल्ह्याचे  लक्ष लागून राहिले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या