पालम तालुक्यातील केरवाडीचा ऑटोला किंनगाव खंडाळी मार्गवर अपघात ९ जखमी

 पालम तालुक्यातील केरवाडीचा ऑटोला किंनगाव खंडाळी मार्गवर अपघात ९ जखमी 



गंगाखेड प्रतिनिधी राजकुमार मुंढे :- पालम तालुक्यातील केरवाडी येथिल प्रवाशी ऑटोला किंनगाव ते माळ्याची खंडाळी ता.अहमदपुर रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ऑटोतील ९ जण जखमी झाल्याची घटना दि.१६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली.सर्व जखमीवर गंगाखेड येथिल उपजिल्हारूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

     पालम तालुक्यातील केरवाडी येथुन अहमदपुर तालुक्यातील अंदोरीला प्रवाशी घेऊन जाणाऱ्या ऑटोला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ऑटो रस्त्याच्याखाली जाऊन पलटी झाला.हा अपघात अहमदपुर तालुक्यातील किंनगाव ते माळ्याची खंडाळी रस्त्यावर धसवाडी पाटीजवळ झाला.ऑटो चालकासह ९ जण जखमी झाले.जखमी पैकी महिला प्रवाशी होत्या.जखमी मध्ये सुरेश विठ्ठलराव गायकवाड वय ३२ वर्ष रा.परभणी , बेबीनंदा सुरेश गायकवाड रा.परभणी , संगिता कामाजी वाघमारे वय ३२ रा.केरवाडी ता.पालम, रेखा अंकुश वाघमारे वय ३८ रा.केरवाडी, सुलोचना गोविंद कदम रा.लाठी, कौसाबाई बाबुराव वाघमारे वय ६० वर्ष रा.केरवाडी ता.पालम, लक्ष्मीबाई बाबुराव खानापुरे वय ६० वर्ष रा.केरवाडी ता.पालम, कामाजी बाबुराव वाघमारे वय ३५ वर्ष रा.केरवाडी ता.पालम,  विनोद पिराजी कांबळे रा.केरवाडी ता.पालम असे जखमीची नावे असुन या पैकी विनोद कांबळे आणि कामाजी वाघमारे यांना गंभिर मार लागला आहे.या दोघाना पुढील उपचारासाठी नांदेडला नेले आहे.जखमीवर उपजिल्हारूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डाॅ.स्वाती मुंढे, डाॅ.कैलास चादकर, परीचारीका राधा बेले, संगिता केंद्रे, माला घोबाळे, आरोग्य कर्मचारी भिमा राठोड, रहिमशाह शेख रशिद यांनी प्राथमिक उपचार केले.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या