श्रावण मासानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला उत्साहात प्रारंभ

 श्रावण मासानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला उत्साहात प्रारंभ



परभणी जिल्हा प्रतिनिधी :- श्रावण मासानिमित्त परभणी शहरातील संत ज्ञान मंडप, श्री गजानन महाराज मंदिर व महालक्ष्मी मंदिर, स्नेह शारदा नगर, वसमत रोड येथे भव्य-दिव्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी अखंड पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला आहे.



हा सात दिवसीय पारायण सोहळा दि. 20 ऑगस्ट 2026 ते 26 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. दररोज सकाळी 7.30 वाजता विष्णुसहस्रनाम पारायण तसेच सकाळी 8 ते 12 या वेळेत श्री ज्ञानेश्वरी पारायण वाचन होत आहे.

या पारायण सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प. बालाजी महाराज तुंगेनवार व ह.भ.प. दादाराव महाराज भालके करीत आहेत. तसेच ज्ञानेश्वरी अभ्यासक बाल चौथी महाराज यांचे विशेष प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.

दि. 26 ऑगस्ट रोजी पारायणाची सांगता व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे मुख्य यजमान म्हणून श्रीमती लतिकाताई मोहनराव मुळे, श्रीमती शीलाताई भागवतराव ढगे, तसेच विजय ढगे, सोनालीताई मुळे, मोनालीताई मुळे यांचे सहकार्य लाभत आहे.

सर्व भाविकांनी या पवित्र ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समितीचे विष्णुभक्त बालाजी महाराज तुंगेनवार, सोपानराव डाळ, महिला मंडळाच्या ललिताताई मुळे, शीलाताई ढगे, शीलाताई कदम, वंदनाताई वाडकर तसेच ज्ञानेश्वरी पारायण प्रचारक नितीन जाधव गोगलगावकर यांनी केले आहे.

॥ जय ज्ञानेश्वर माऊली ॥

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या