उस्मानाबाद जिल्ह्यातील बेलेश्वर विद्यालय पाखरूड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले

 उस्मानाबाद जिल्ह्यातील बेलेश्वर विद्यालय पाखरूड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले



भूम तालुका प्रतिनिधी :- प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी बेलेश्वर विद्यालय पाखरूड येथे शाळेच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कुलकर्णी सर होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संभाजी चव्हाण,डॉक्टर लक्ष्मण चव्हाण,मेजर श्रीकांत चव्हाण व श्री रघुनाथ वाघमोडे हे होते,



 यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन केले व नंतर ध्वजारोहण करून, सामूहिक राष्ट्रगीत म्हणून ध्वजाला मानवंदना केली.नंतर वेगवेगळ्या वेशभूषा करून, देशभक्ती पर गीतातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेमाची झाकी तसेच लेझीम व दांडीया नृत्य सादर केले,


प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त बेलेश्वर विद्यालय पाखरूड येथे पंधरा ते वीस दिवसापासून विविध प्रकारचे खेळ व इतर उपक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सहभाग घेतला होता. त्या अनुषंगाने प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने प्रोत्साहन पर बक्षीस वितरण करण्यात आले व भूम तालुक्यातील विजय रघुनाथ वाघमोडे यांची 48 किलो वजन कुस्ती गटामध्ये निवड झाल्याबद्दल बेलेश्वर विद्यालय पाखरुडच्या वतीने विजय रघुनाथ वाघमोडे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शाळेच्या वतीने मुख्याध्यापकांनी शुभेच्छा दिल्या.


 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमान बुटे सर यांनी केले, लेझीम पथकाचे आयोजन श्रीमान काळे सर यांनी केले,तर कार्यक्रमाचे आयोजन श्रीमान भोसले सर,मुंडे सर,आवारे मॅडम,जिल्हा परिषद शाळेचे सोनवणे सर व त्यांच्या सर्व शिक्षक स्टाफ यांनी केले, यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील,अनेक मान्यवर व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या