गावखेड्यात उत आला निवडणुकीच्या गप्पाला !विसरला माणूस जन्म दात्या बापाला

 गावखेड्यात उत आला निवडणुकीच्या गप्पाला !विसरला माणूस जन्म दात्या बापाला



कामाच्या ना कामाच्या,गप्पा मेलेल्या राजाच्या विसरला उपकार बाप व आजचा.

उमरगा प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव :- लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर उमेदवार अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ येत असताना ग्रामीण भागात पारावर, टपरीवर, चौकात सध्या लोकसभा निवडणुकीच्याच गप्पा रंगताना दिसत आहेत. यामुळे गाव खेड्यातील राजकारण तापू लागले आहे. सध्या शेतीचे कामे संपल्याने बळीराजा राजकीय चर्चा करुन श्रमपरिहार करताना दिसत आहे.


सध्या जो तो देशाच्या राजकारणावर भाष्य करीत आहे. आपापल्या परीने राजकीय अंदाज मांडत आहे. प्रत्येक कार्यकर्ता आपला पक्ष कसा प्रबळ आहे, हे पटवून देत आहे. सध्या गावगाड्यातील वातावरण निवडणुकमय बनले आहे. लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा लोक महोत्सव. या लोकमहोत्सवाची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असते. त्या अनुषंगाने आता सर्वत्र गप्पागोष्टी रंगत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने अनेक मुद्यांचा उहापोह होताना दिसत आहे. ग्रामीण भागात प्रामुख्याने शेतमाल भाव, खते, पाणी, उद्योगधंदे, शिक्षण, वीज, रोजगार आदी मुद्यांवर चर्चा होत आहे. त्यानंतर पक्ष, पक्षफुटी व उस्मानाबाद (धाराशिव )लोकसभा मतदार संघाचा महायुतीचा की महाविकासआघाडीचा  उमेदवार  कोन जिंकेल याची चर्चा रंगताना दिसत आहे. आतापर्यंत झालेला विकास कोणता व सर्व सामान्यांना नेमक काय हवे, याबाबत गावाच्या पारावर चर्चा रंगू लागल्याचे दिसते. काही राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाली आहे तर काहींचा अद्याप उमेदवार निश्चित नाह. त्यामुळे कोणता उमेदवार येणार, कोणत्या पक्षाचा उमेदवार पराभूत होणार व कोण जिंकणार, याबाबत खमंग चर्चा रंगत आहेत. ज्येष्ठ मतदारांच्या चर्चेतून वेगवेगळी माहिती व अनुभव ऐकायला मिळत आहेत. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अशा चर्चाचे फड रंगत आहेत. सध्या तरी लढत कोणामध्ये होणार, यावरून वातावरण टाईट होताना दिसत असून, कोण जिंकतो, कोण हरतो, याचा निवाडा निवडणूक निकालानंतर होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या