खुुलताबाद जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, राजकीय पुढारी सतर्क

 खुुलताबाद जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी  प्रशासन सज्ज, राजकीय पुढारी सतर्क



मुनीर शाह बाजार सावंगी  :- खुलताबाद : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असुण नामांकन पत्र विक्री व नामांकन पत्र दाखल प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रक्रिया ला दि.१६ सुरुवात झाली असुण शुक्रवार ते शनिवार दोन दिवसात ७० ते ७५ नामांकन पत्र अर्जाची विक्री झाली होती. नामांकन पत्र अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख २१ जानेवारी आहे. दोन दिवसाचा अवधी आहे. निवडणूक प्रक्रिया सुलभव्हावी म्हणून बाजार सावंगी, गदाणा, वेरुळ जिल्हा परिषद गट साठी यांना स्वतंत्र व्यवस्था टेबल तर पंचायत समिती गण बाजार सावंगी, ताजनापूर, गदाणा, टाकळी राजेराय, वेरुळ, गल्ले बोरगाव गणा साठी वेगळे टेबल लावून उमेदवारांना अधिक माहिती समस्या तथा कामे सुरळीत व्हावे म्हणून टेबल लावण्यात आले आहे. तर निवडणूक प्रक्रिया साठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असल्याचे चित्र असुण क्षेत्र अधिकारी म्हणून १९ अधिकारी, १०४ मतदान केंद्र अधिकारी, ३१२ मतदान अधिकारी, ६ फिरते पथके (फ्लांइग स्क्वॉड), ४ स्थीर पथके


व एक वैद्यकीय अधिकारी आदि यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. या संदर्भात प्रशासनाकडून शनिवारी आढावा बैठक घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक शांततेत व पारदर्शक सुरळीत पार पडावी म्हणून सुचना मार्गदर्शन करुन सचेत करण्यात आले आहे. यावेळी महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व इतर तहसील कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक मतदार संख्या, बाजार सावंगी जिल्हा परिषद गट मतदार संख्या २९४६७, गदाणा जिल्हा परिषद गट मतदार संख्या २७४६५, वेरुळ जिल्हा परिषद गट मतदार संख्या २८३७५, तर पंचायत समिती मतदार संख्या बाजार सावंगी पंचायत समिती गण १४८५२, टाकळी राजेराय पंचायत समिती गण १४६१५, ताजनापूर पंचायत समिती गण १३१०९, गदाणा पंचायत समिती गण १४३५६, गल्ले बोरगाव पंचायत समिती गण १४१०९, वेरुळ पंचायत समिती गण १४२६६ मतदार संख्या आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती तीन गटात व सहा गणात विविध पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या बैठका भेटीगाठी जोरदार पणे सुरु आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या