आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच मराठा व धनगर बांधवांसाठी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन.!
गंगाखेड प्रतिनिधी :- गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेवून मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय सकारात्मक भूमिका घेऊन मार्गी लावा, असे लेखी निवेदन देत विनंती केली आहे. त्यावर मुख्यमंत्री महोद्यांनी लवकरच विषय मार्गी लागेल, असे आश्वासन दिले आहे.
मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी शेतकरी पुत्र, मराठा योद्धा श्री.मनोज जरांगे पाटील हे मौजे आंतरवाली सराटी तालूका अंबड जिल्हा जालना येथे तर धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा,या मागणीसाठी प्रामाणिक कार्यकर्ते श्री सुरेश दादा बंडगर हे मौजे चौंडी तालूका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे उपोषणाला बसले होते. हे दोन्ही लढ्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असल्याने,समाजात असंतोषाच्या भावना तीव्र भडकून कायदा,सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने व राष्ट्राचे पालकत्व निष्क्रीय कृती करत असल्याने,मराठा तरुण आत्महत्येसारखे टोकाची पावले उचलत आहेत.तर धनगर समाज सुध्दा आक्रमक होत आहे.दोन्ही बाजूंनी तीव्र संघर्ष सुरू आहे.
या बाबीचा विचार राष्ट्रहिताची जानिव लक्षात घेउन,गंगाखेड विधानसभा आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेबांनी,मराठा व धनगर समाजाच्या मागण्यांना व उपोषणरूपी लढ्यास माझा जाहीर पाठींबा दर्शवून.मराठा व धनगर समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे,अशी ठाम भूमिका असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शेतकरी पुत्र,मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले असून.जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत अन्न व वैद्यकीय उपचारही घेणार नाही,अशी कठोर भूमिका श्री जरांगे पाटीलांनी घेतल्याने,सरकारवर रोष व्यक्त करून. लोकप्रतिनिधी व पुढाऱ्यांना गावबंदी केली,अशीही माहिती लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निर्देशनास आणून दिली आहे.
मराठा व धनगर बांधवांच्या मागण्या आणि लढाईस माझा बिनशर्त पाठींबा देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने मी उद्या म्हणजे ३० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजेपासून मौजे बनपिंपळा येथील त्यांच्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांसह एकदिवसीय अन्नत्याग आंदोलनासाठी.राष्ट्रीय समाज पक्ष आणि मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होवून आपला पाठींबा दर्शवावा, असे आवाहन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेब यांनी केले आहे.

0 टिप्पण्या