समाजहित अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश साखरे यांची निवड.

समाजहित अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश साखरे यांची निवड.
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी करण्यात येत असते त्या अनुषंगाने परभणी शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे व सचिव रमेश घनघाव यांच्या मुख्य समन्वयातून साजरी करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्या नुसार दिनांक 22 मार्च रोजी प्रतिष्ठान कार्यालय, डॉ. आंबेडकर नगर येथे प्रमोद अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते *आकाश साखरे* यांची *समाजहित अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2023च्या अध्यक्षपदी निवड* करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्ष पदी रमाताई घोंगडे, सचिव पदी अजय शिराळे, हरदिप सिंग बावरी, कोषाध्यक्ष पदी शेख अझहर, विकास जमधाडे, सहसचिव पदी शंकर बनसोडे, दीपक बनसोडे, विनोद वाडेकर, रेखाताई कांबळे, सरीताताई अंभोरे, संघटक पदी संदीप वायवळ, आकाश राक्षे, अब्दुल रहमान खान, वंदनाताई खिल्लारे आदींची निवड करण्यात आली. तर सल्लागार म्हणून प्रा. राजकुमार मनवर, प्रा. यशवंत मकरंद, सलीम इनामदार, भूषण मोरे, सुनील ढवळे, अमर गालफाडे, संभाजी पंचांगे, संदिप लहाने व मार्गदर्शक संघपाल अढागळे, राहुल धबाले, बाळू भाऊ घिके, बालाजी कांबळे, सय्यद जमील, रियाज खूरेशी, राजू कर्डिले आहेत आणि सदस्य प्रेम तुपसमुंद्रे, अजय नंदपटेल, राहुल घोंगडे, मिलिंद मस्के, सिद्धांत सूर्यवंशी, प्रकाश अंभोरे, शुभम कोरडे, बंटी गायकवाड, अमर कोडगिर, मुन्नी बाई शिरसे, जया निकाळजे, वैभव गायकवाड आदीची निवळ करण्यात आली. जयंती समितीच्या अध्यक्षपदी आकाश साखरे यांनी निवड करण्यात आल्याने त्यांचा प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या