आमदार डॉ रत्नाकर गुट्टे काका यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त दान शिबीराचे आयोजन
पालम प्रतिनिधी:-
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसा निमित्त,बुधवार, दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार सविस रोजी,
पालम तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन,करण्यात येणार आहे.या निमित्ताने पालम पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब ढोले,उपसभापती बालू आजा बरडे तसेच गुट्टे काका मित्र मंडळाचे पालम तालुका अध्यक्ष चंद्रशेखर लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवस,उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू आहे.
या उपक्रमाला पालम तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद,वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहिताचे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून,मोठ्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी,होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



0 टिप्पण्या