तिरंगा रॅली बीडहून औरंगाबादला आज दुपारी निघणार,चलो मुंबई! मोठ्या संख्येने सामील व्हा - समस्त मुस्लिम समाज

 तिरंगा रॅली बीडहून औरंगाबादला आज दुपारी निघणार,चलो मुंबई! मोठ्या संख्येने सामील व्हा - समस्त मुस्लिम समाजात



बीड प्रतिनिधी :- आज दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईला जाणारी तिरंगा रॅली बीडहून औरंगाबाद करिता निघणार आहे. तर औरंगाबाद येथून मुंबई पर्यंत सर्वपक्षीय, सर्व धर्मीय तिरंगा रॅली निघणार असून यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समस्त मुस्लिम समाजाकडून करण्यात आले आहे.

या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व वाहनांनी आज दिनांक 22 सप्टेंबर 2024 रविवार रोजी बीड शहरातील मोमीनपुरा बायपास येथील बिंदुसरा नदी पात्र मैदानात आपल्या वाहनांसोबत दुपारी 12:00 वाजेपर्यंत जमावे. तिथून दुपारी 04:00 वाजता बीड ते औरंगाबाद तिरंगा रॅली निघणार आहे. मोमीनपुरा बायपास वरून रॅली निघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, माळीवेस चौक, बलभीम चौक, बशीरगंज चौक, शिवाजी महाराज पुतळा चौक ते जालना रोड मार्गे औरंगाबाद कडे प्रयाण करणार आहे. औरंगाबादला पोहोचल्यानंतर तिथे सर्वांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. औरंगाबादला आज रात्री मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच दिनांक 23 सप्टेंबर 2024 सोमवार रोजी सकाळी 06:00 वाजता रॅली साठी जमलेल्या सर्वांचे नाश्ते झाल्यावर ही तिरंगा रॅली औरंगाबादहून मुंबईकडे प्रयाण करणार आहे. रॅलीमध्ये येऊ इच्छिणारे आणि वाहन चालकांनी शेख एजाज़ उर्फ खन्ना भैय्या 9822548492, शेख मतीन 9011655220, मोमीन अज़हर 9766757123, सय्यद सैफ़ अली उर्फ लालू भैय्या 9284360071, सोहेल शिकलकर 7385754645, शेख मुदस्सीर 8793564042 यांच्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधून आपल्या वाहनांची नोंद करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या