पालम पंचायत समिती येथे,सेवन रजीस्टर वितरण व मार्गदर्शन शिबीर संपन्न,

 पालम पंचायत समिती येथे,सेवन रजीस्टर वितरण व मार्गदर्शन शिबीर संपन्न,



पालम प्रतिनिधीं :- महाराष्ट्रातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची, अमलबजावणी २००५ साली करण्यात आली, ग्रामीण स्तरावर ग्रामरोजगार हमीचे कामात पारदर्शकता  यावी म्हणून, गाव तिथ ग्राम रोजगार सेवक निवड करण्यात आली, परंतु काही कारणाने कामात आडथळे व सदर ग्राम रोजगार सेवकाला राजकीय दबाव व गावपातळीवर मनमाने वर्तनाला सामोरे जावे लागत असल्याने, शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची नियम बदल करुन 



ग्राम रोजगार सेवकाला आयडी पासवर्ड देऊन, दबाव व  राजकिय मनमानीतून बंधन मुक्त केले,त्या अनुषंगाने कामातील पारदर्शकता व कर्तव्यदक्षेतेने कामे व्हावी म्हणून, वेळोवळी होणारे बदल व नियम माहिती देण्यासाठी,पालम पंचायत समिती येथे मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. 



त्याच धर्तीवर पालम तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री उदयसिंह शिसोदे यांनी  ग्रामरोजगार सेवकांची कार्यशाळा आयोजित केली, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची इत्यंभूत माहीती व कामाची नोंद घ्यावी या साठी सेवन रजीस्टर वितरण व


त्या बाबत, ग्राम रोजगार सेवकांना प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली,यावेळी 


 मॅनेजमेंट अधिकारी श्री माधवराव कदम सर यांनी सविस्तर व मुद्देशुद माहिती दिली, जेनेकरुन ग्राम रोजगार सेवकांना सोपे सुलभ व नियमाला अनुसरून काम करता येईल, तसेच गटविकास अधिकारी उदयसिंह शिसोदे यांनी, ग्राम स्तरावरील जास्तीत जास्त लाभार्थी या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे फायदे घेतील व स्वतः बरोबर गावाचाही विकास करतील, असे कार्य करण्यास प्रोत्साहित केले,यावेळी एपीओ अनिल तिगोटे,टीएस पी मुंडे,श्री सुधाकर बहिर सर, मंचकराव राठोड, बंडगर, आपरेटर राजू जोगदंड, जाधव सर,व सर्व रोजगार सेवक उपस्थित होते. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या