नागपूर प्रतिनिधी: - जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भारतीय जलसंसाधन संस्था नागपूर तर्फे ५ जुन रोजी 1000 मौल्यवान झाडे विनामूल्य वाटप करण्यात आले. लक्ष्मी भुवन चौक, धरमपेठ नागपूर येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक इंजि. राजेश सोनटक्के, सुप्रसिद्ध आर्टिस्ट विवेक रानडे, भारतीय जलसंसाधन संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रवीण महाजन, इंजि. आर. जी. पाटील, इंजि. रविंद्र वानखडे डॉ. विजय घुगे यांचे हस्ते नागरीकांना विविध प्रजातींच्या एक हजार रोपट्यांचे वाटप करण्यात आले.
अन्न वस्त्र निवारासह सर्व गरजा पूर्ण करणारी झाडे आपल्याला शुद्ध हवा देतात ऑक्सिजन पुरून हवेची गुणवत्ता सुधारतात हवामानाचे संतुलन ठेवतात पाणी साठवून ठेवण्यासाठी झाडे महत्त्वपूर्ण कार्य करतात मातीचे रक्षण करणे वर्णन जेव्हा आधार देणे अशी पर्यावरण जाळणे कामे करणारी ही झाडे संस्थेतर्फे वाटप करण्यात आली असून त्यात कडुनिंब, शिसव, करंज, जारूळ व तबेबुईया होती. दोन तासात 1000 झाडे संपली. जे लोकं झाडे लावून संगोपन करतील अशाच लोकांना झाडे वाटप करण्यात आले.
या लोकांची नांवे व पत्ते, मोबाईल नंबर घेऊन त्याची लागवड पाहणी भविष्यात संस्थे तर्फे करण्यात येईल. यावेळी परीसरातील नागरीकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. परीसरातील नागरीकांनी दिलेली वृक्ष लागवड करण्यास मदत तर केलीच शिवाय त्यांची निगा राखण्याची तयारीही दर्शविली.
डॉ. प्रवीण महाजन, इंजी. किशोर वंरभे, रवीकांत पैठणकर, इंजी. राजेश ढुमणे, डॉ. विजय घुगे, प्रो. रागीट, मुन्ना महाजन, भगवानदास राठी, सौ रसिका जगदाळे, प्रतीक महाजन, दीपेश यादव, सतीश ढोबले, कार्तिक ढेंगरे, महेश राठी, विवेक दीक्षित, विनायक कुरेकर, अनिल बोथले इत्यादीसह मौल्यवान झाडे विनामूल्य वाटप करून पर्यावरण दिन साजरा केला.
0 टिप्पण्या