कै. छगन आप्पा जाधव यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक, धार्मिक आणि अध्यात्मिक उपक्रमातून श्रद्धांजली

 कै. छगन आप्पा जाधव यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक, धार्मिक आणि अध्यात्मिक उपक्रमातून श्रद्धांजली



परभणी प्रतिनिधी :-

परभणी जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक आणि गोभक्त कै. छगन आप्पा जाधव यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक, धार्मिक आणि अध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.



कै. छगन आप्पा जाधव गोसंवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट, गोगलगाव, तालुका मानवत, जिल्हा परभणी तसेच वीर वारकरी सेवा संघ आणि राष्ट्रजन फाउंडेशन, परभणी यांच्या वतीने रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी विविध ठिकाणी सेवा उपक्रम राबविण्यात आले.

सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय येथे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान आणि फळांचे वाटप करण्यात आले.

तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, वृंदावन कॉलनी येथे श्री विष्णुसहस्रनाम पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. व्याख्याते प्राध्यापक महेश देशमुख सर यांनी उपस्थित भाविकांशी हितगुज करत आध्यात्मिक मार्गदर्शन केले.

याचबरोबर श्री महालक्ष्मी मंदिर, स्नेहनगर येथे सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सहभागी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.

या विविध उपक्रमांना राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालयाचे अध्यक्ष ह.भ.प. गोविंद महाराज पौढे, विष्णुसहस्रनाम उपासना मंडळाचे ह.भ.प. सुरेश महाराज धावरकर, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मंडळाचे ह.भ.प. बालाजी महाराज तुंगेनवार यांच्यासह रुद्राक्ष आवटे, रितेश आवटे, जाधव परिवार आणि भाविक भक्तांची उपस्थिती होती.

यावेळी कै. छगन आप्पा जाधव गोसंवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा वीर वारकरी सेवा संघाचे परभणी प्रदेशाध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी सांगितले की, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून धार्मिक, अध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सेवेसाठी खर्च करणे, हीच कै. छगन आप्पा जाधव यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

सेवा, अध्यात्म आणि समाजोपयोगी कार्यातून कै. छगन आप्पा जाधव यांच्या स्मृतींना अनोखी मानवंदना देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या