सहा गावतिल सर्व मागण्या प्रमाणे प्रशासनाकडून लेखी अश्वासन,उपोषण तूर्तास मागे,वेळेवर काम नाही झाले तर जिल्हाकार्यालया समोर उपोषणाचे आव्हान.

 सहा गावतिल सर्व मागण्या प्रमाणे प्रशासनाकडून लेखी अश्वासन,उपोषण तूर्तास मागे,वेळेवर काम नाही झाले तर जिल्हाकार्यालया समोर उपोषणाचे आव्हान. 



पालम प्रतिनिधी :- अडीच वर्षांपासून रखडलेल्या केरवाडी ते सिरपूर (ता.पालम) रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी मान्य झाल्याने शुक्रवारी (ता.4) सहा गावातील ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. त्यासाठी प्रशासनाने लेखी अश्वासन दिले असून 5 एप्रिलपासून रोडच्या कामाला सुरूवात होईल.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता मेराज खान आणि काॅण्ट्रक्टर प्रकाश चाटे यांनी उपोषणकर्त्यांना लेखी दिले. तत्पूर्वी, महावितरणे उपअभियंता रावडे यांनी देखील सिरपूरसाठी नवीन रोहित्र आणि विद्युत खांब देण्याचे मान्य करीत लिहून दिले. शिवाय, सिरपूर ते पालम रस्त्यासाठी देखील तरतूद करण्याचे मान्य केले. म्हणून उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. तिथे पालम ठाण्याचे पोनि सुरेश थोरात, नगरसेवक बालासाहेब रोकडे यांनी उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजले.पालम ते सिरपूर शिवरस्त्यादरम्यानच्या खदानित पालम नगरपंचायकडून कचरा टाकण्यात येत आहे. त्याची दुर्गंधी गावापर्यंत येत असून त्यावरील माशा परिसरात उपद्रव करीत आहे. दुर्गंधीमुळे येथील शेतक-यांना शेतात काम करणेही शक्य होत नाही. त्यांच्या शेतात मेनकापड, कोंबडे व बक-यांचे कुत्रे आणून टाकत आहेत. तिथे 20 ते 30 कुत्रे राहत असून एकट्याने शेतात जाणेही भितीदायक आहे. म्हणून पालम ते सिरपूर शिवरस्त्याच्या खदानीत टाकण्यात येणारा कचरा बंद करण्याची मागणी कायम आहे. ती लवकर मान्य केली नसल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.केरवाडी ते सिरपुर (ता.पालम) रस्त्याची मगनी मन्या झाल्याचे एक्टी पत्र पोनी सुरेश थोराट, कोमोरात, मेराज खान, नगर सेवक बालासाहेब रोकडे यांच्याकदून स्विकारताना उपोषणकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या