सत्य कथा धनगराच्या पोराची,बुध्दी सुन्न केली थोरा थोराची,होय धनगरच गर्व आहे जातीचा व जन्मभुमीच्या मातीचा,

 सत्य कथा धनगराच्या पोराची,बुध्दी सुन्न केली थोरा थोराची,होय धनगरच गर्व आहे जातीचा व जन्मभुमीच्या मातीचा,

कोल्हापुर प्रतिनिधी :- एकदम हालाकिच्या परिस्थितीत ही ध्येय गाठलं,मेंढपाळाच लेकरू,नाही तोपर्यंत नाही पण गाठल ते शिखरच गाठलं,

आहे का आता,आहो मी कोल्हापुर जिल्हातील,कागल तालुक्यातील, श्री बिरदेव डोणे यांच्या यशाबद्दल बोलतोय,ज्या बिरदेव डोणेचा,फोन हरवला असता,पोलीस स्टेशनमध्ये  सर्वसामान्य धनगर समाजातील मुलाची तक्रार पोलिसांनी घेतली नाही,पण भगवान के पास देर मगर अंधेर नही है,या उक्तीनुसार,तोच मुलगा UPSC परीक्षा पास होऊन IPS अधिकारी बनला आहे,काय म्हणता,आहो ही कोणत्या सिनेमाची कथा नव्हे तर,एका धनगरांच्या पोरान घडवलेलं वास्तव आहे,आज जीकड तीकड फेसबुक, वाट्स्प वर जे व्हायरल होत आहे,तेच कोल्हापुर जिल्हातील कागल तालुक्यातील श्री बिरदेव डोणे यांच्या यशाबद्दल जेवढ कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा,बिरदेव डोणे बद्दल देवालाही आनंद वाटावा व तरूनांनी आदर्श घ्यावा अस ध्यय घडवल,त्याबद्दल अभिनंदन.

कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे कागल येथील बिरदेव सिद्धप्पा डोणे यांनी 

कठोर परिश्रम आणि सातत्याने त्यांनी,UPSC परीक्षेत 551वा रँक पटकावून यश मिळवलेले सबंध कोल्हापूरकरांना प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे,बिरदेवचे उदाहरण हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत ठरणार आहे. आपल्या हातून समाजाच्या प्रति आदर आणि सेवा घडत राहो, 

त्यांच्या देशसेवेच्या आणि प्रशासनातील कारकिर्दीस मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,याचबरोबर, संपूर्ण देशात तिसऱ्या क्रमांकावर आलेले आर्चित डोंगरे, तसेच ठाणे येथील तेजस्वी देशपांडे, अंकिता पाटील, हेमराज पनोरेकर यांच्यासह राज्यभरातील इतर यशस्वी उमेदवारांचेही हार्दिक अभिनंदन!सर्वांचे खूप खूप अभिनंदन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या