रस्त्या अभावी सहा गावचे ग्रामस्थ बेजार, उद्घाटन करून ठेकेदारच पसार,
सहा गावातील ग्रामस्थांचे उपोषण केरवाडी ते सिरपुर रस्त्याचा प्रश्न सुटणार कधी?
पालम प्रतिनिधी : मागील अडीच वर्षांपासून रखडलेल्या केरवाडी ते सिरपूर ता. पालम रस्त्याच्या मागणीसाठी ६ गावातील ग्रामस्थांच्या उपोषणास गुरुवार पासून सुरुवात. ते मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार.
स्वातंत्र्यानंतर एकदा या रस्त्याच्या वाट्याला डांबरीकरण आले होते. त्यानंतर रस्त्याच्या मंजुरीसाठी देखील यत्न करावे लागले. त्यात ग्रामपंचायत सदस्यांनी कोविड काळात गावात उपोषण केले. त्यावर उपोषणस्थळी येऊन आमदार रत्नाकर गुट्टे यांनी रस्ता मंजूर केला. तदनंतर थोडेफार काम झाल्यानंतर कंत्राटदाराने काम बंद केले. त्याला अडीच वर्ष लोटले, तरीही पुन्हा कामास सुरुवात केली नाही. परिणामी, शालेय विद्यार्थी, शेतकरी, वृद्ध, अपंग, महिलांना प्रशासनाच्या दिरंगाई मुळे चिखल तुडवित येजा करावी लागते. ना शासनास,ना लोकप्रतिनीधींना याचे काही सोयर सुतक नाही. परिणामी, वाहने फसने, पावसापूर्वीच कृषी निविष्ठा गावात नेवून ठेवणे,रस्त्या अभावी मान्सूनमध्ये विद्यार्थ्यांना शाळेवर पाणी सोडावे लागणे, रूग्नांना दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता कोरडा पडण्याची वाट पाहवी लागणे, हे संकट प्रशासनामुळे पाच गावांवर ओढवले. त्याची जाणीव अधिकारी, कर्मचारी महानगरात राहत असल्यामुळे त्यांना काय काय कळणार. म्हणून सदर रस्त्यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामस्थांनी अखेर उपोषणाचा पर्याय निवडला.त्यात पालम ते सिरपूर शिवरस्त्या दरम्यानच्या खदानित पालम नगरपंचायकडून टाकण्यात येणारा टाकण्यात येणारा कचरा बंद करण्यात यावा, सिरपूर ते पालम राज्यरस्त्याचे काम मंजूर करावे, सिरपूर येथे ऐकमेव ट्रान्सफार्मर असून त्यावर लोड सहन होत नसल्याने दुसरे ट्रान्सफार्मर मंजूर करून विजेचे खांब देण्यात यावेत आदी मागण्यांचा समावेश आहे. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होणार नाही, तोपर्यंत सिरपूरसह,सायळा, केरवाडी, उमरथडी, धनेवाडी, खुर्लेवाडी, रावराजूरवासिय उपोषण सुरूच ठेवणार आहेत.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अभियंत्यांनी मागील अडीच वर्षापासून झुलवत ठेवले. प्रत्येक वेळी निधी नाही किंवा लवकरच काम सुरू करू, असे कारण समोर करून वेळ मारून नेली. परिणामी, रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. आता पावसाळा तोंडावर आला असताना देखील काम सुरू करायची याची मानसिकता व कुठल्याही हालचाली या विभागाच्या दिसत नाहीत.
रस्त्याच्या उद्घाटनाप्रसंगी कंत्राटदाराने दोन महिन्यात काम पूर्ण करून देणार, अशी वल्गना केली होती. त्यानंतर कंत्राटदार फिरकला देखील नाही. त्याला कुठलेही सोयरसुतक नाही. ते फोन स्वीकारत नाहीत, जरी फोन घेतला तरी आज उद्या करून अडीच वर्ष घातली; पण रस्ता सुरू करण्याचा पत्ता नाही




0 टिप्पण्या