ग्रामसेवक पवारसाहेब व सरपंच सौ कल्पना खर्डे प्रयत्नातुन गल्लीतील पाणी प्रश्न सुटला.
पालम प्रतिनिधी :- अनेक वर्षांपासून विकासा पासून वंचित गल्लीतील आखेर पाणी प्रश्न सुटला,ग्रामसेवक पवारसाहेब व सरपंच सौ.कल्पना खर्डे याचे गल्लीतील नागरिकातून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
अनेक वर्षांपासून तांबुळगाव येथील ही गल्ली विकासापासून वंचित आहे,अनेक सरपंचांनी मतांसाठी आश्वासने खुप दिली,मात्र विकासाच्या नावान बोंबाबोंब, गल्लीतील गोरगरीब साधेभोळे नागरिक मतापुरत्या दिलेल्या भूलथापांना बळी पडायचे,निवडून आले की आश्वासन विसरून, स्वार्थ साधू या गल्लीकडे दुर्लक्ष करायचे,पण जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे या संताच्या उक्तीनुसार, सामान्य कुटुंबातील कल्पना खर्डे सरपंच झाल्यावर बोर पाडून देईल अस अश्वासन दिले होते,
आज त्यांनी ते पुर्ण केले,ग्रामसेवक विश्वनाथ पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार पंधराव्या वित आर्थ साहाय्यातून बोर मंजुर करून अखेर दिलेला शब्द पुर्ण केल्याबद्दल, सदर गल्लीतील नागरिक सौ.कल्पना खर्डे व ग्रामसेवक विश्वनाथ पवारसाहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करत आहेत.बोर मशिन चालू करतांना गल्लीतील महिला व पुरुष उपस्थित होते.




0 टिप्पण्या