कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जन्मभूमी ते कर्मभूमी ज्ञानज्योत यात्रेस पालम येथून प्रारंभ.
पालम प्रतिनिधी :- सगरोळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील कर्मयोगी बाबासाहेब देशमुख उर्फ के.ना. यांचे जन्मशताब्दी वर्ष 27 मार्च 25 ते 27 मार्च 26 असा साजरा करण्यात येणार आहे. कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांचा जन्म पालम येथील देशपांडे वाड्यात झालेला आहे. बाबासाहेब देशमुख हे अत्यंत शिस्तप्रिय असून सगरोळी जिल्हा नांदेड येथे ग्रामीण भागात शाळा काढून तेथील गोरगरीब जनतेला ज्ञानदानासारखे पवित्र कार्य त्यांनी केले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्कारही मिळालेला आहे.
आज दि.२८ मार्च रोजी पालम येथील देशपांडे यांच्या वाड्यात एका भव्य कार्यक्रमात दीप प्रज्वलित जन्मशताब्दी सोहळ्याला सुरुवात करून नरसी ते सगरोळी पर्यंत मशाल(ज्ञानज्योत) नेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात मान्यवरांनी बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या सामाजिक कार्याची जाणीव पालमकरांना करून दिली. त्यांनी आयुष्यभर जातीवाद,वर्णवाद यांना विरोध करत सर्व जाती धर्माच्या जनतेला शिक्षण मिळुन जिवनात सक्षम व्हावे यासाठी अहोरात्र प्रयत्न केले.
या कार्यक्रमाला कर्मवीर बाबासाहेब देशमुख यांचे चिरंजीव देविदासराव देशमुख, आशाताई देशमुख, विनोदराव देशमुख,स्मिता देशमुख, प्रमोद राव देशमुख, सुनंदाताई देशमुख, विलास देशपांडे ,सुलोचनाताई देशमुख, अनुराधा देगलूरकर, भुजंगराव पालमकर, जयंत जकाते तसेच परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गणेशराव रोकडे, पालमचे नगराध्यक्ष वसंतराव सिरस्कर, नगरसेवक लक्ष्मणराव रोकडे, कैलास रुद्रवार, बाबासाहेब जामगे, शिवाजीराव दिवटे, लिंबाजीराव टोले, पांडुरंग रुद्रवार, दिलीप रुद्रवार, राजू शेठ पत्की, मुंजाभाऊ रोकडे, प्रमोद इनामदार, संतोष पत्की सह गावातील असंख्य नागरिक व ब्रह्मवृंद उपस्थित होते.
आलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार करत,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदुदेवा जोशी यांनी केले, संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन मनोज देशपांडे यांनी केले.


0 टिप्पण्या