श्री तुळजा भवानी मंदीर सोने-चांदी वितळविण्याबाबत विघ्नसंतोषी चोराच्या उल्ट्या बोंबा,
किशोर गंगणे यांनी दिलेले निवेदनाची दखल घेऊ नये,असे कमीटीचे प्रशासनाला निवेदन
तुळजापूर प्रतिनिधी :- कमिटीच्या सदस्य यादीत नाव नाही म्हणून विघ्नसंतोषी किशोर गंगणे यांनी विधीज्ञ शिरीष कुलकर्णी यांच्या मार्फत निवेदन देवून मंदीरातील नवीन विकास आराखड्यास व सोने -चांदी वितळविण्यास विरोध दर्शविला.
मंदिरातील सोनेचांदी वितळविण्या साठी व देखरेखेसाठी जी कमिटी नियुक्त केलेली आहे त्यात तथाकथीत समाजसेवक किशोर गंगणे यांचे नाव नसल्याने ते व्यथीत होवून केवळ विरोधासाठी हा प्रयत्न आहे,
वास्तविक पाहता त्यांना मंदिरात गैरकृत्य केल्याप्रकरणी अनेक वेळा शिस्तभंगाची कार्यवाही,अनेकवेळा मंदिर प्रवेश बंदी,मंदिरची सतत बदनामी केल्याप्रकरणी एक कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा देखील कोर्टात प्रलंबीत आहे तसेच इतर ही अनेक गुन्हे कोर्टात दाखल आहेत.अशा समाजघातक व्यक्तीकडून मंदिर विकासबाबत काय अपेक्षा ठेवावी हाच खरा प्रश्न आहे.
विकासाभिमुख आमदार तथा मंदिर विश्वस्त राणादादा पाटील यांनी तुळजापूर शहर व मंदिर विकासाबाबत घेतलेली प्रत्येक भुमिकेसोबत आम्ही भोपे पुजारी मंडळ असून पुर्वीच्या मंदिरातील सोने चांदी गैरकारभारा बाबत कोर्ट प्रकरण चालू असल्याने तसेच कोर्टाने कुठलीही स्थगिती आदेश दिलेली नसताना विकासाला विरोध करणे योग्य नाही ? सध्या तुळजापूरात भाविकांची व वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे.काळानुसार शहरात व मंदिरात नव्याने बदल होणे गरजेचे झालेले आहे, अन्यथा एक दिवस मोठी दुर्घटना होईल उद्रेक होईल याला जबाबदार कोण याचा विचार करूनच गंगणे यांनी दिलेले निवेदनाची दखल न घेता फेटाळण्यात यावे असे अमरराजे कदमि, परमेश्वर अध्यक्ष भोपे पुजारी मंडळ तुळजापूर निवेदनात म्हटले आहे .

0 टिप्पण्या