शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती दिन उत्साहात साजरा

 


शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती दिन उत्साहात साजरा



पालम प्रतिनिधी :

शिवनेरी महाविद्यालय, पालम येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त शुक्रवार, दि. १ ऑगस्ट रोजी प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थिनी लक्ष्मी पवार हिने तयार केलेल्या आकर्षक भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. तोंडारे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. एस. व्ही. सोनटक्के यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचा तसेच लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रसेवेचा प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडून सांगितला.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. तोंडारे यांनी लेखन प्रेरणा दिनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी, कारण "वाचन संस्कृती वाढवणे ही आजच्या काळाची गरज आहे," असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य एस. एम. वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. आर. ई. गायकवाड यांनी केले.

यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या