वृक्षदिंडीने गजबजला पेठपिंपळगावचा परीसर

वृक्षदिंडीने गजबजला  पेठपिंपळगावचा  परीसर  


पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव  
                    
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठपिंपळगाव येथे वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले.यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर अशी वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांच्या डोक्यावर रोपटे देऊन वृक्षदिंडीमध्ये सहभागी झाले होते.संपूर्ण गावांमध्ये वृक्षदिंडी काढण्यात आली. यामध्ये गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गावातील तरुण,ज्येष्ठ नागरिक,त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,अध्यक्ष,सदस्य,BRC मधील साधन व्यक्ती श्री. हराळे सर,श्री.गिरी सर या सर्वांना  शाळेतर्फे तयार करण्यात आलेली "हर घर नर्सरी"या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेली रोपवाटिकेतील रोपटे देऊन त्यांना वृक्षदिंडीमध्ये सहभागी करून घेण्यात आले. 
वृक्षदिंडीनंतर वृक्षारोपण करण्यात आले.*विद्यार्थ्यांना बाल अवस्थेमध्ये वृक्षारोपणाचे महत्त्व समजून वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे हे मूल्य रूजवण्यासाठी वृक्षदिंडीची फार मोठी मदत होईल असे शाळेचे मुख्याध्यापक श्री.बने सरांनी मार्गदर्शन  करताना सांगितले* 

*या वृक्षदिंडी मध्ये शाळेतील शिक्षक श्री गायकवाड सर,कदम सर,पटेल सर,सतीश जाधव सर,सौ.कराळे मॅडम, सुडके मॅडम,मुख्याध्यापक बने सर तसेच गावातील  गावातील नागरिक राजेश शिंदे ,विजय गाणार,उद्धव शिंदे,मारोती कदम,मल्हारी आव्हाड गावातील ज्येष्ठ नागरिक मंचकराव जाधव,मोहन शिंदे,आबासाहेब शिंदे,आबासाहेब जाधव,कैलासराव शिंदे,उत्तम शिंदे,सुनील शिंदे,ज्ञानेश्वर कदम, बाबुराव रामजी शिंदे,गणेश शिंदे, पांडुरंग मुलगिर,सुरेश मोडके,गोविंद गाणार,मदन जाधव,मेघराज जाधव,ऋषिकेश पौळ या सर्वांनी सहभाग घेऊन प्रत्यकाना रोपटे देऊन वृक्ष लागवड करण्यासाठी प्रेरित करण्यात आले यावेळी यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या