चापोलीतील भुमीपुत्रांचा गौरव व जाहीर सत्कार सोहळा संपन्न.
चापोली प्रतीनिधी :-चापोली येथील आदर्श जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमीक शाळेत दिनांक 03/09/2025रोजी सायंकाळी 05 ते 08 या वेळेत चापोली (चंपावती नगरी) च्या भुमीपुत्रांचा गौरव,सन्मान व जाहीर नागरी सत्कार सोहळा समस्त गावकरी चापोली व मित्रपरिवार यांच्या वतीने ठेवण्यात आला होता.
या वेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती श्री.सुरेश माधवराव शेटकर सेवानिवृत्त पोलीस काॅन्स्टेबल त्यांच्या पत्नी सौ सविता सुरेश शेटकर, सत्कारमूर्ती आयु श्री.विलास केशवराव चापोलीकर नुतन मुख्याध्यापक यशवंत प्राथमीक विद्यालय अहमदपूर,त्याच्या सुविज्ञ पत्नी सौ शालीनी विलास चापोलीकर जिल्हा परिषद शिक्षिका,सत्कारमूर्ती श्री.वहाबमियाॅ खैरातमियाॅ देशमुख सेवानिवृत्त शिक्षक मौलाना आझाद मराठी प्राथमीक शाळा उदगीर हे होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.शंकरराव गणपतराव कांबळे (पाटील) सेवानिवृत्त अभियंता जिल्हा परिषद लातूर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी ज्युनीयर काॅलेज चापोली चे माजी प्राचार्य तथा संजीवनी विद्यालय चापोली चे माजी मुख्याध्यापक श्रीयुत मन्मथ विश्वनाथाप्पा शेटकर, चापोली चे माजी सरपंच व माजी चेअरमन श्री.जहीरमियाॅ देशमुख, चापोली चे माजी उपसरपंच श्री महेताबसाॅब मोमीन,भाजपा नेते श्री सुरेश दादा हाक्के साहेब,माजी पोलीस उपनिरीक्षक सेवानिवृत्त श्री.फारुखमियाॉ देशमुख,श्री काशिनाथ गंगापुरे सेवानिवृत्त शिक्षक तथा संचालक नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ चापोली, श्री.माधव लातुरे राज्य नेता महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती,श्री संजय आलमले राज्य उपाध्यक्ष शिक्षक काॅग्रेस संघटना,ग्रा पं चापोली चे विद्यमान सदस्य श्री निलेश मद्रेवार,ग्रा पं सदस्य श्री नाथा मद्रेवार,ग्रा पं सदस्य श्री.बाबुराव भालेराव,ग्रा पं सदस्य माऊली चाटे,माजी व्हाईस चेअरमन रामेश्वर व्होनराव,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री.परमेश्वर स्वामी,शाळेचे शाळा व्यवस्थापन समीती चे अध्यक्ष श्री.मुसद्दीक छोटेमियाॅ देशमुख,शिक्षणप्रेमी अॅड संग्राम व्होनराव लोकमतचे वार्ताहर, जिल्हा युवा उपाध्यक्ष भाजपा रमेश पाटील हे होते.या सोहळ्यास चापोली मधील शेकडो गावकरी,गावातील आजी माजी पदाधिकारी,इष्ट मित्रपरिवार बंधू भगीनीं उपस्थीत होते.हा कार्यक्रम श्री माधव लातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय प्रा.श्री. मनोज शिंदे सामाजीक कार्यकर्ते व मित्रपरिवार,आणि तालूका चाकूर मनसे चे अध्यक्ष श्री.सुरेश शेवाळे व मित्रपरिवार तसेच श्री काशिनाथ लातूरे आणि मित्रपरिवार यांनी समस्त गावकरी चापोलीकर यांच्या वतीने आयोजित केला होता.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पहील्या महीला शिक्षिका आद्य स्त्रि शिक्षणाच्या क्रांतीकारक यांच्या प्रतीमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. उपस्थीत व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले.या सत्कार सोहळ्याचे मार्मिक व सविस्तर,बहारदार प्रास्ताविक श्री माधव लातुरे यांनी केले.व नंतर सत्कारमूर्ती श्री.सुरेश शेटकर व सौ.सविता सुरेश शेटकर,सत्कार मुर्ती श्री.विलास चापोलीकर व सौ शालीनी विलास चापोलीकर,सत्कार मुर्ती श्री.वाहबमियाॅ खैरातमियाॅ देशमुख,या सर्वांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व ग्रामस्थ व मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला.या वेळी सत्कार मुर्ती श्री वहाबमियाॅ देशमुख,श्री सुरेश शेटकर,श्री विलास चापोलीकर,यांनी आपण कसे घडलो व आपल्या यशात कोणाकोणाचा वाटा आहे.जिवनात माणसाने कशी कामे केली पाहिजेत,आपला मित्रपरिवार व गावाविषयी प्रेम, आपुलकी व्यक्त करून गुणगौरव सन्मान करून गावकरी व मित्रपरिवार यांनी ह्या मोठया कार्यक्रमाचे आयोजन करून आमचा सपत्नीक जाहीर तत्कार केला.अनेक सत्कारा पैकी आपल्या गावकरी व मित्रपरिवार यांनी केलेला मानसन्मान व सत्कार हा सर्वात मोठाअसतो हा अविस्मरणीय क्षण आम्ही जिवनभर विसरणार नाही.या शुभेच्छा व सन्मान यांच्या बळावर आम्ही पुढील जिवनात वाटचाल करू अशा भावना उपस्थित गावकरी यांच्या समोर व्यक्त केल्या.तसेच कार्यक्रमात उपस्थितामधून मनोगतात सत्कार मुर्ती यांच्या कार्याचा गुणगौरव,सन्मान करून,श्री संजय आलमले,अॅड श्री संग्राम व्होनराव, प्रा.श्री. मनोज शिंदे,श्री सुरेश शेवाळे,श्री रमेश पाटील, शुभेच्छा देण्यासाठी आलेले भारतीय जनता पार्टीचे नेते श्री.सुरेश दादा हाक्के साहेब यांनी आपापली मनोगते व्यक्त करून सत्कार मुर्ती यांचा गुणगौरव सन्मान करून पुढील भावी आयुष्यासाठी निरोगी आरोग्य लाभो आणि आपणास उदंड आयुष्य लाभो,आपल्या मनातील सर्व स्वप्ने पुर्ण होवोत अशी जगद्निर्मात्या ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना केली.या कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ व चापोलीतील आणि गावाबाहेरचे मित्रपरिवार जवळपास तीनशे नागरीक उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शंकर गणपतराव कांबळे पाटील सेवानिवृत्त अभियंता यांनी सविस्तर मनोगत व्यक्त करून सत्कार मुर्ती यांच्या कार्याचा गौरव करून अशा कार्यक्रमांचे आयोजन नेहमी गावकरी यांच्या वतीने झाले पाहिजे असे मत मांडले.या सोहळ्याचे बहारदार, मोठे,सुंदर नियोजन केल्या बद्दल आयोजकांचे कौतूक केले.कार्यक्रमास उपस्थित झाल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन करून या सोहळ्यास उपस्थीत असलेल्या सर्वांनी सर्व सत्कार मुर्ती यांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या रायगड निवास नायगाव रोड येथील सुरूची व स्वादिष्ट भोजनाचा अस्वाद घेवून जाण्याबाबत सर्वांना सुचित करून अध्यक्षीय समारोप केला.या कार्यक्रमाच्या आयोजन व नियोजन आणि यशस्वीतेसाठी,भोजन व्यवस्था नियोजन सन्माननीय श्री काशिनाथ लातूरे माजी ग्रा पं सदस्य तथा चाकूर तालुका सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनी केले होते व इतर नियोजन श्री माजी व्हाईस चेअरमन श्री रामेश्वर व्होनराव श्री बस्वराज मुर्गे,श्री.गोविंद गंगाधराव चाटे,श्री नितीन साऊंड सर्व्हीस चापोली चे संचालक सन्माननीय श्री सुरेश भालेराव,ग्रा पं सदस्य माऊली चाटे,जि प शाळा चापोली येथील सन्माननीय आदर्श विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री.बरदाळे सर,आदर्श शिक्षीका श्रीमती सुरेखा मुर्गे,युवा कार्यकर्ता संतोष मन्मथ स्वामी यांनी विशेष सहकार्य केले. उपस्थितांचे आभार प्रदर्शन जि.प. शाळेचे शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते तथा चाकूर तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी मानले. एक अविस्मरणीय वजनदार, बहारदार,सुंदर,देखना, भावनीक,अभिष्ट चिंतन गौरव व ऐतिहासिक सन्मान सोहळा, निमंत्रित मान्यवर, प्रमुख पाहुणे,मार्गदर्शक,असंख्य गावकरी,इष्ट मित्रपरिवार,अप्तस्वकीय, सगेसोयरे,नातलग व्यापारी,शेतकरी,बंधू भगीणी यांच्या उपस्थितीत सुरूची भोजना नंतर संपन्न झाला.





0 टिप्पण्या