पालम शहरातील पेठपिंपळगाव चौकात आंदोलन, संजय राऊत यांच्या पुतळ्यास मारले जोडे.
पालम तालुका प्रतिनिधी :- पालम शहरातील पेठपिंपळगाव चौकात शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी, पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेतल्यानंतर श्री राऊत थुंकले होते,त्याचा निषेध करीत राऊत यांच्याविरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसेनेच्या वतीने राऊत यांचे पोस्टर पायाखाली तुडविले. श्री. राऊत यांना वाचाळवीर म्हणीत शिवसेना संपविण्यासाठी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतल्याचा आरोप आंदोलनात करण्यात आला.
दरम्यान, पालम ते लोहा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माधवराव कदम, विधानसभा प्रमुख चंद्रकांत सुर्यवंशी, तालुका प्रमुख तथा उपसभापती भाऊसाहेब पौळ, ज्येष्ठ नेते लालखाँ पठाण, आरोग्य सेनेचे तालुका प्रमुख सदाशिव पवार, उप तालुका प्रमुख भानुदास कराळे, अंबादास ठाकूर, माजी पंं.स. सदस्य भीमराव भूसनर, दत्तराव देशमुख, बालाजी बीडकर, प्रमोद दुधाटे, युवा प्रमुख संदीप चाळक, शहर प्रमुख कृष्णा सिरस्कर, सरपंच पाराजी दाढे, संतोष पैके, राजेश देशमुख, माजी नगरसेवक शेख अकबर, संघटक रंगनाथ पौळ, ताहेरखाँ पठाण, भीमराव लांडे, खय्यूम पठाण, शेख शफीक, विनायक पौळ, लक्ष्मण पौळ, राम गवळी, संजय पौळ, काशिनाथ खोंडे, संदेश कुलकर्णी, सुदाम पौळ, मारोतराव पौळ, रामजी जाधव यांच्यासह आदी उपस्थित होते.

0 टिप्पण्या