रुरल एक्सप्रेस'चे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांचे हस्ते विमोचन
पालम तालुका प्रतिनिधी :- ध्येय धोरण व जिद्द चिकाटी मनात ठेवून, सामाजिक,राजकीय, धार्मिक क्षेत्रातील माहिती व जनसंपर्क या सर्व गोष्टींचा विचार करून,पालम तालुक्यातील मौजे फरकंडा येथील, तरुण तडफदार कार्यकर्ते, अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षक संघटना परभणी जिल्हा प्रशिध्दी प्रमुख, पत्रकार सुरक्षा समिती परभणी जिल्हा सरचिटणीस, तथा रूरल एक्स्प्रेस वृत्तपत्राचे संपादक श्री प्रसाद सखाहारी पौळ यांनी घेतलेली हे एक तरूणांना प्रोत्साहन व आदर्श निर्माण करणारे पुढचे पाऊल आहे.सतत चळवळ व धडपडणाऱ्या युवकाची यशाच्या मार्गावरील क्रांती म्हटले तर वावगे ठरणार नाही,
प्रसाद सखाहारी पौळ यांच्या रूरल एक्स्प्रेस वृत्तपत्राचे,गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे साहेब यांचे हस्ते शुक्रवार दि. २ जून रोजी पालम येथे विमोचन केले व रुरल एक्सप्रेसच्या पुढील वाटचालीस आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी रा. स. पा. जिल्हाध्यक्ष संदीप आळनूरे, पालम प्रभारी माधवराव गायकवाड, गुट्टे काका मित्र मंडळ तालुका अध्यक्ष बालासाहेब रोकडे, रा. स.
पा. नेते शेख गौस, युवा अध्यक्ष भगवान शिरसकर.रामेश्वर पौळ, राहुल शिंदे,नवनाथ पौळ, गणेश दुधाटे,विशाल रोकडे, संपादक प्रसाद पौळ तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0 टिप्पण्या