तालुका प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील कॅप्टन जोशी स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचा इयत्ता दहावीचा निकाल ९२.५०% लागला असुन प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. त्यात प्रथम कुमारी हुळमजगे देवकन्या मल्लिनाथ ८९.००% ,द्वितीय कुमारी तेली अस्मिता बालाजी ८८.२०%, व तृतीय कुमारी कंटेकुरे नंदिनी गुलाब ८७.२०%, गुण घेऊन यशस्वी झाले. एस. एस.सी.बोर्ड परीक्षेचा निकाल शुक्रवारी दि.२ रोजी जाहीर झाला असून विद्यालयातून यावर्षी परीक्षेसाठी एकूण ८० विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये विशेष प्राविण्य २२व प्रथम श्रेणी ३५ द्वितीय श्रेणी १६ तृतीय श्रेणीत ०१ विद्यार्थ्यांनी एकूण ७४ विद्यार्थी विद्यालयातून यश संपादन करून उच्च माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवली.संस्थेचे अध्यक्ष श्री देवराज बिराजदार, श्री परमहंस शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री.बाबुराव बिराजदार साहेब, संचालक आनंदराज बिराजदार सर,व सर्व संचालक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री महेश हारके सर, वर्गशिक्षक शंकर हुळमजगे,महेश खंडाळकर ,व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, येणेगुर ग्रामस्थांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

0 टिप्पण्या