दुःख सावरुन परिक्षा दिलेली तहूरा फातिमा इयत्ता दहावीच्या परीक्षेत मिळविले ८१.६० टक्के गुण घेऊन विशेष प्राविण्याने उत्तीर्ण.

दुःख सावरुन परिक्षा दिलेली तहूरा फातिमा इयत्ता दहावीच्या परीक्षेत मिळविले ८१.६० टक्के गुण घेऊन विशेष प्राविण्याने उत्तीर्ण. 

 मुलीचं यश पहाण्याच वडिलांच्या नशिबी नव्हते असेच म्हणावे लागेल,कारण परिक्षेच्या अवघ्या आठ दिवस अगोदर वडीलाचे निधन झाले, तरी ही ताहुराने परिक्षा दिली व यशस्वी झाली.
बीड जिल्हा प्रतिनिधी :- शहरातील शांती निकेतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी शेख तहुरा फातिमा ख़दीर ने नुकत्याच घोषित झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालामध्ये ८१.६० टक्के गुण घेत विशेष प्राविण्‍याने यश मिळविले आहे. तिने मिळविलेल्या या यशाला अनपेक्षितपणे दुःखाची किनार लागलेली आहे. इयत्ता दहावीची परीक्षा सुरू व्हायला अवघ्या एक आठवड्याचा कालावधी बाकी असताना तहुराचे वडील मुहम्मद अब्दुल ख़दीर यांचे अकस्मात निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर अवघ्या आठव्या दिवशीच तिचा इयत्ता दहावीचा पहिला पेपर होता. वडिलांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबीयांसह तिच्यावरही दुःखाचे डोंगर कोसळले होते. वडिलांच्या जाण्याचे दुःख सहन करून तिने इयत्ता दहावीची परीक्षा दिली. आणि नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये तिला ८१.६० टक्के गुण मिळाल्याचा निकाल हाती आला. गुण तर चांगले मिळाले परंतु हा आनंद पाहण्यासाठी तिचे वडील आज हयात नाहीत मात्र निकालानंतर तहूराने प्रतिक्रिया देताना म्हटले की, माझ्या वडिलांची इच्छा होती की मी चांगले शिक्षण घ्यावे. दरवर्षी उत्तमोत्तम गुण मिळवावे आणि जीवनात चांगले काहीतरी साध्य करावे. यामुळे दिवंगत वडिलांची इच्छा पूर्ण करण्याकरिता यापुढेही मी चांगला अभ्यास करून पुढील शिक्षण पूर्ण करणार असून वडिलांची इच्छा पूर्ण करणार आहे. ते ताऊ, काका, आई, मामा आणि सर्व भावांच्या मदतीने. यापुढे माझ्या शिक्षणासाठी निश्चितपणे या सर्वांची मदत व सहकार्य राहणार असे म्हटले. तिच्या या दृढ निश्चयाचे कौतुक करत प्राचार्य अनिल जोशी व वर्ग शिक्षक विवेकानंद गायकवाड यांनी पुढील शिक्षणासाठी तिला शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या