ध्यास समाज सेवेचा हाच खरा धर्म मानवतेचा,
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- परभणी जिल्ह्यातील प्राणीमित्र, गोसेवक,लोकसेवक,धार्मिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने, नितीन छगनराव जाधव पाटील गोगलगावकर हे राम कृष्ण हरी मित्र मंडळ परभणी, संस्थापक अध्यक्ष वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र,संस्थापक कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष या माध्यमातून,वयाच्या बारा वर्षापासून 2006 पासून,हनुमान जयंती,महापुरुषांच्या जयंतीच्या माध्यमातून सामाजिक कार्यक्रम राबवतात,
तसेच स्वच्छता अभियान,वृक्ष लागवडी अभियान,जल है कल है अभियान, गोमातेच्या संदर्भात,पशु पक्षाच्या संदर्भात,जनजागृती अभियान 2012 पासून करतात,प्रभावती नगरी गौरव पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून नामवंत कलाकार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी इत्यादी व्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देण्यात येतो, नितीन गोगलगावकर यांना राज्य शासनाचे पुरस्कार स्वच्छता व बेटी बचाव बेटी पढाव, covid-19 चा संस्कृतिक अभियान पुरस्कार तसेच इतर इतर संघटनेच्या वतीने सत्कार व पुरस्काराने गौरविण्यात आले आहे
नितीन गोगलगावकर हे सरकारी दवाखाना येथे अन्नदान मोहीम, महामानवाच्या जयंती पुण्यतिथी निमित्त सामाजिक क्षेत्रात जनजागृती,व पंढरपूर शिपाई वारी अनेक जेसीबी चालकांना लोकांना तिरुपती बालाजी,श्री शेत्र पंढरपूर, परळी वैजनाथ,श्री क्षेत्र औंढा अशा देवस्थानाला मोफत नेऊन, व्यसनं मुक्त चालक मार्गदर्शन केले, इत्यादी उपक्रम नितीन गोगलगावकर यांनी राबवले आहेत, या साठी त्यांनी कोणाकडे वर्गणी अथवा अर्थीक मदत मागितली नाही,धार्मिकसेवक नितीन छगनराव जाधव पाटील गोगलगावकर उर्फ माऊली जन्म भूमी गोगलगाव,तालुका मानवत,जिल्हा परभणी,सध्या मुक्काम रामकृष्ण नगर वसमत रोड परभणी प्रभाग 15 येथे राहणाऱ्या नितीन गोगलगावकर यांच्या सामाज कार्याबद्दल करावे तेवढे कौतुक कमीच आहे,

0 टिप्पण्या