मराठवाडा शेती सहाय्य मंडळ,व्दारा कृषी विज्ञान केंद्र. खरपुडी, जालना येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान संपन्न.
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत CLF अध्यक्ष /सचिव यांच्या SHG PRI Convergennce या विषयावर कृषी विभाग (KVK) जालना मार्फत घेण्यात येणा-या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते,
यावेळी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान सन २०२२-२३ क्षमता बांधणी व प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रभाग संघाच्या अध्यक्ष व सचिव यांचे करीता SHG Pri Convergennce या विषयावर
संदर्भ ०२ व ०३ अन्वये, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान (RGSA) सन २०२२-२३ अंतर्गत CLF अध्यक्ष सचिव यांच्या कृषी विभाग (KVK) जालना मार्फत दि. २४/०२/२०२३ ते दि. २५/०२/२०२३ या कालावधी दरम्यान आयोजित SHG-PRI Convergennce या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले
असून सदरील प्रशिक्षणास परभणी जिल्हयातील ३४ प्रभागसंघाचे अध्यक्ष व सचिव असे एकूण ६८ प्रशिक्षणार्थी कृषी विभाग (KVK) जालना येथे उपस्थीत शिबिर संपन्न झाले,पालम तालुक्यातील, अध्यक्ष सचिव सदर शिबिरात सहभागी झाले होते, शिबिरातून, ग्राम पातळीवर बचतगटाच्या माध्यमातून विकात्मक ध्येय व महिला सक्षमीकरणातू कौटुंबिक आणि सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी योग्य असे मार्गदर्शन मिळाले असे माध्यमांशी बोलताना पालम तालुक्यातील,पेठशिवणी सर्कल प्रमुख सौ.सविता सोपणे यांनी सांगितले.

0 टिप्पण्या