तहसीलदार असो की कलेक्टर असो पैशापुढं कायदाही भरतो पाणी,म्हणून चालते माझी वाटेल तशी मनमानी,
तांबुळगाव येथील सरपंच पतीची रोजगार सेवकाला मस्टर काढण्या साठी धमकीची भाषा
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- ग्रामीण भागातील विकासासाठी व मजूरांना हाताला काम मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने मनरेगा कायद्याची अंमलबजावणी केली असता, कामे पारदर्शक व्हावी म्हणून, प्रत्येक गावात एक ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली,
परंतू मौजे तांबुळगाव येथील सरपंच सौ कल्पना बाबुराव खर्डे यांचे पती श्री बाबुराव लक्ष्मण खर्डे यांनी मनरेगा कायद्याची पायमल्ली करून चक्क, यंत्राद्वारे केलेल्या कामाचे मस्टर काढण्यासाठी कामावरुन काढण्याची धमकी देऊन, ग्रामसभा आयोजित केली असता, ग्रामपंचायत सदस्य हजर न राहिल्याने ग्रामसभा बरखास्त झाली,व सरपंच सौ कल्पना बाबुराव खर्डे यांची मराठी सही असूनही, सरपंच पती श्री बाबुराव लक्ष्मण खर्डे यांनी स्वतः इंग्रजी सह्या करून मनमाने कारभार करीत असल्याचे लक्षात येताच, ग्रामपंचायत सदस्य, श्री अनिल कोंडीबा उंदरे, सौ जयश्री मारोती उंदरे, सौ गोकर्णा पांडुरंग हिंगणे,सौ पदमीनबाई भुजंग ससाणे, श्रीमती चतुराबाई श्रीरंग आवळे यांनी अविस्वास ठराव दिनांक १७/०५/२०२३ रोजी दाखल केला असता,पालम तहसीलदार सौ प्रतिभा गोरे यांनी दिनांक १९/०५/२०२३ रोजी अविस्वास ठराव पारित करण्यासाठी ग्रामसभा घेऊन,सदस्यातून निवडणूक झालेल्या सरपंच व उपसरपंच यांच्यावरील अविस्वास ठराव, जनतेतून होणाऱ्या नियमानुसार फेटाळला असता, सरपंच सौ कल्पना बाबुराव खर्डे यांचे पती, श्री बाबुराव लक्ष्मण खर्डे हे ग्राम रोजगार सेवकांला तुझ्या मुळे माझ्या खोट्या सह्या व कामाचा भ्रष्टाचार उघडकीस आला, पण कलेक्टर असो की, तहसीलदार असो,पैशापुढ कायदा ही पाणी भरतो,तू रोजगार हमी कायद्याचे काय घेऊन बसलास, गपचिप सह्या कर, तहसीलदारन काय केलं हे तरी लक्षात घे, नाही तर मला लक्षात घ्यावं लागेल अशी धमकी दिली,
तरी मनरेगा कायद्याची पायमल्ली करून सरपंच पती श्री बाबुराव लक्ष्मण खर्डे यांनी, यंत्राद्वारे कामे करून रोजगार सेवकाला मस्टर काढण्यासाठी धमकी दिल्या बद्दल चौकशी अंती योग्य ती कारवाई करून,गोरगरीब मजूरांना काम न देता, यंत्राद्वारे कामे केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे ग्राम रोजगार सेवक श्री शेषराव सोपणे यांनी जिल्हा अधिकारी व अधिक्षक साहेबांना दिलेल्या निवेदनात म्हटले असल्याचे, माध्यमांशी बोलताना सांगितले,

0 टिप्पण्या