दैठणा जवळ कार व मोटारसायकचा अपघात तीन ठार दोन गंभिर जखमी.
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- दैठणाजवळ भरधाव वेगात येत असलेल्या कारणे दोन मोटारसायकला जोराची धडक दिली यात
तीनजण मृत्यू झाले तर दोनजण गंभिर जखमी आहेत हा अपघात मंगळवार दिनांक ९ मे रोजी दुपारी १२-३० च्या सुमारास परभणी गंगाखेड रोड वर दैठणा जवळ चेतन बार समोर घडला
अपघाता विषयी सुत्रानी दिलेली अधिक माहिती अशी की दीपक मारोतराव कच्छवे वय २४ वर्षे विवेक माणिक नाईक वय २५ वर्षे दोन्ही राहणार दैठना तर तिसरा मयत बाबाराव चव्हाण वय ४८ वर्ष रा,सुप्पा.तांडा अशी मैतांची नावे आहेत तर या अपघातात पवन माधवराव कचवे वय २७ वर्षे धोडिबा घोलप रा.सुप्पा हे जखमी झाले आहेत. दीपक कचवे विवेक नाईक, पवन कचवे,हे दूचा चाकी ने पोखरणी नरशिह येथे लग्नाला जात होते तर सुप्प्पा येथिल दोघे हे परभणी कडे जात असतांना दैठण्याजवळ एम एच १४ सी एक्स ८३४० या क्रमांकाच्या भरधाव कारने एम बी एच २६ डी ६८०२ आणि एम एच २२ ए वाय ३६ ९१ या क्रमांकाच्या दुचाकीला जोराची धडक दिली
या अपघातात दीपक कचवे विवेक नाईक या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सुप्पा येथिल बाबाराव चव्हाण यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर पवन कचवे आणि धोडिंबा घोलप हे दोघे जखमी झाले आहेत गंभीर जखमी पैकी एकाला उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे अपघातानंतर अनियंत्रित झालेली कार रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन पडली या अपघाताची माहिती मिळाल्यावर दैठणा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी टिप्पलवाड पोलीस उपनिरीक्षक बळीराम मुंडे जमादार एन. एन.फड, विनोद मुळे,मनोहर सुरवसे, कुकडे, यांनी अपघातातील जखमीना उपचारासाठी दाखल केले.

0 टिप्पण्या