भारतीय बौद्ध महासभा,स्मृती बुद्ध विहार समितीच्या वतीने बुध्द रॅली अतिउत्साहाने संपन्न.
उस्मानाबाद धाराशिव जिल्हा प्रतिनिधी :- तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६७ व्या जयंतीनिमित्त भारतीय बौध्द महासभा, स्मृती बुद्ध विहार समिती व दि बुध्दिष्ट आॅफ सोसायटीच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांच्या वतीने बुध्द रॅली अतिउत्साहाने काढण्यात आली,सकाळी विश्वरत्न, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली,
सायंकाळी 06 वाजता भीम नगर क्रांती चौक येथुन बुध्द रॅलीस सुरुवात झाली,ही रॅली शासकीय रुग्णालय समोरून, मारवाडी,गवळी गल्ली,गुजर गल्ली,नेहरु चौक रोड ते काळा मारुती मंदिर चौक, जिल्हाधिकारी निवास समोरुन संत गाडगेबाबा चौक ते भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत असे नियोजन करण्यात आले होते,अगदी दोन रांगेत हातात धम्म व निळा ध्वज घेऊन बुध्द,भीम, भारतीय संविधान आणि इतर महामानवाच्या नावाचा जयघोष करीत बौध्द समाज बांधव शिस्तीचे पालन करुन बुध्द रॅलीत सहभागी झाले होते,दोन उंट,बॅण्ड बाजा पथक अगदी पारंपारीक वाद्य संगीतातुन भीम बुद्ध गीते वाजविली जात होती, बुद्ध रॅली परमपुज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ आल्यानंतर सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन सुनिल आप्पा बनसोडे,समाज बांधवांच्या वतीने फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजीत जागेत खिरदान वाटप करण्यात आली.रॅलीत बौध्द समाज बांधवांसहीत इतर समाज बांधव देखिल उपस्थित होते,पोलीस प्रशासन यांचे सहकार्य लाभले,रॅलीत महिला भगिनी लहान मुले यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता, प्रामुख्याने उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभाचे जिल्हा सरचिटणीस धनंजय वाघमारे,तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,बौध्दाचार्य गुणवंत सोनवणे,शिलाताई चंदनशिवे, रंजनाताई लगाडे तर माजी नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे,राणा बनसोडे, पृथ्वीराज चिलवंत,विद्यानंद बनसोडे,विजय बनसोडे, दादासाहेब जेटीथोर,मृत्युंजय बनसोडे,गणेश रानबा वाघमारे,संतोष बनसोडे,रवीराज माळाळे,सचीन दिलपाक, अंकुश पेठे,पुष्पकांत माळाळे,संजय गजधने, स्वप्निल शिंगाडे,निखिल बनसोडे,चंदन लांडगे,मेसा जानराव,सोमनाथ गायकवाड,मुकेश मोटे,मुन्ना घरबुडवे,महादेव एडके,अतुल लष्करे,आनंद बनसोडे,श्रीकांत मटकिवाले,विनायक गायकवाड,सोहन बनसोडे,सुनिल आप्पा बनसोडे,संजय सरवदे,माने,सुधाकर माळाळे,आप्पा सिरसाठे, स्वराज जानराव विशाल, घरबुडवे,प्रविण बनसोडे, कैलास शिंदे,आनंद भालेराव सहीत भारतीय बौद्ध महासभा,स्मृती बुद्ध विहार समिती व दि बुध्दिष्ट ऑफ सोसायटीचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

0 टिप्पण्या