काँग्रेसच्या कर्नाटकी विजयाबद्दल चुकचुकली शंकेची पाल;मोठा झोलझाल असल्याची शक्यता :- एस.एम.युसूफ़

काँग्रेसच्या कर्नाटकी विजयाबद्दल शंकेची पाल;मोठा झोलझाल असल्याची शक्यता - एस.एम.युसूफ़ 

बीड जिल्हा प्रतिनिधी :- कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या निर्भेड विजयाबद्दल देशात शंकेची पाल चूकचुकत असून यात मोठा झोलझाल असल्याची शक्यता नाकारता येणार नाही असे मत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, कर्नाटक मध्ये काँग्रेस पक्षाने मिळविलेल्या निर्भेळ  यशामुळे आपल्या भारत देशात लोकशाहीची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहे याची प्रचिती पुन्हा एकदा आली असली तरी संपूर्ण भारतात ईव्हीएम ला भाजप वगळता अनेक पक्षाचा विशेष करून काँग्रेसचा विरोध होत आहे. हा विरोध बंद व्हावा, ईव्हीएम हद्दपार होऊ नये. याकरिता २०२४ च्या लोकसभा निवडणूक अगोदर काँग्रेसला शांत करण्यासाठी उंगली न केलेले ईव्हीएम ने कर्नाटक राज्यात मतदान झाल्याचे वाटत आहे. यामुळेच तिथे काँग्रेस पक्षाला बहुमत मिळू शकले परंतु बेरकी भाजप २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत असे ईव्हीएम मतदानाकरिता येऊ देणार नाही. तेव्हा उंगली केलेले ईव्हीएमच आणले जाईल आणि मग पुन्हा मतदार मतदान कोणत्याही चिन्हावर करो ते कमळाबाई वरच पडेल. अशी शंकेची पाल आपल्या भारत देशातील सर्वसामान्य मतदाराच्या मनात चूकचुकत  असून यात मोठा झोलझाल असल्याचे ही बोलले जात असल्याचे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या