पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना अर्जित रजा रोखीकरण सातव्या वेतन आयोगाप्रमाणे द्या;
आठ वर्षापासूनची थकबाकी (एरियस) द्या,अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना बीड जिल्हा कार्यकारिणीची मागणी
बीड जिल्हा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावे तसेच गेल्या आठ वर्षापासून ची थकबाकी (एरियस) ही लवकरात लवकर देण्यात यावी. अशी मागणी अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना बीड जिल्हा कार्यकारिणीने बीड जिल्हाधिकारी, माजलगाव तहसीलदार आणि पाटोदा तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
याविषयी पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र पोलीस विभागाला सातवा वेतन आयोग जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आला असून त्याप्रमाणे वेतन चालू आहे. परंतु २०१६ पासून अद्याप पर्यंतही अर्जित रजा रोखीकरण सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात येत नाही. आठ वर्षांचा मोठा कालावधी उलटूनही रजा रोखीकरण हे सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात येत आहे. ही बाब पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आठ वर्षापासून होत असलेला हा अन्याय दूर करून न्याय देण्याकरिता राज्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण सातव्या वेतन आयोगाप्रमाणे लवकरात लवकर देण्यात यावे तसेच आतापर्यंतची थकबाकी (एरियस) लवकरात लवकर देण्यात यावे. अशी मागणी अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना बीड जिल्हा कार्यकारिणीने बीड जिल्हाधिकारी, माजलगाव तहसीलदार आणि पाटोदा तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली असून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार रजा रोखीकरण देण्यात आले नाही तसेच थकबाकी (एरियस) ची रक्कम लवकरात लवकर देण्यात आली नाही तर संघटनेकडून लोकशाही मार्गाने राज्यस्तरावर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर बीड जिल्हाध्यक्ष तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़, उपाध्यक्ष डॉ. शेख एजाज, माजलगाव तालुकाध्यक्ष इमरान खान, पाटोदा तालुकाध्यक्ष सतीश गर्जे यांची नावे व सह्या आहेत. निवेदन देताना इंद्रजीत जाधव, राजरत्न खळगे, पत्रकार तथा मार्गदर्शक पठाण हमीद खान, रामदास भाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना अर्जित रजा रोखीकरण सातव्या वेतन आयोगाप्रमाणे द्या;
आठ वर्षापासूनची थकबाकी (एरियस) द्या,अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना बीड जिल्हा कार्यकारिणीची मागणी
बीड जिल्हा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावे तसेच गेल्या आठ वर्षापासून ची थकबाकी (एरियस) ही लवकरात लवकर देण्यात यावी. अशी मागणी अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना बीड जिल्हा कार्यकारिणीने बीड जिल्हाधिकारी, माजलगाव तहसीलदार आणि पाटोदा तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
याविषयी पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र पोलीस विभागाला सातवा वेतन आयोग जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आला असून त्याप्रमाणे वेतन चालू आहे. परंतु २०१६ पासून अद्याप पर्यंतही अर्जित रजा रोखीकरण सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात येत नाही. आठ वर्षांचा मोठा कालावधी उलटूनही रजा रोखीकरण हे सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात येत आहे. ही बाब पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आठ वर्षापासून होत असलेला हा अन्याय दूर करून न्याय देण्याकरिता राज्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण सातव्या वेतन आयोगाप्रमाणे लवकरात लवकर देण्यात यावे तसेच आतापर्यंतची थकबाकी (एरियस) लवकरात लवकर देण्यात यावे. अशी मागणी अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना बीड जिल्हा कार्यकारिणीने बीड जिल्हाधिकारी, माजलगाव तहसीलदार आणि पाटोदा तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली असून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार रजा रोखीकरण देण्यात आले नाही तसेच थकबाकी (एरियस) ची रक्कम लवकरात लवकर देण्यात आली नाही तर संघटनेकडून लोकशाही मार्गाने राज्यस्तरावर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर बीड जिल्हाध्यक्ष तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़, उपाध्यक्ष डॉ. शेख एजाज, माजलगाव तालुकाध्यक्ष इमरान खान, पाटोदा तालुकाध्यक्ष सतीश गर्जे यांची नावे व सह्या आहेत. निवेदन देताना इंद्रजीत जाधव, राजरत्न खळगे, पत्रकार तथा मार्गदर्शक पठाण हमीद खान, रामदास भाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

0 टिप्पण्या