निबंधक व रजिस्ट्री कार्यालयात दलालांचा सुळसुळाट.

तुळजापुरात तहसील, रजिस्ट्री कार्यालयात दलालांचा सुळसुळाट तहसील कार्यालय दुय्यम निबंधक व रजिस्ट्री कार्यालयात दलालांचा सुळसुळाट.

उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी :- कार्यालयात कुठल्याही कामासाठी नागरिकांना एजंट आणि दलालांचे सहकार्य घेतल्याशिवाय कुठलीही कामे होत नाही. या कार्यालयात दलालांचा व एजंटांचा सुळसुळाट पसरला आहे. तहसील कार्यालयात रेशनकार्ड अकृषी जमीन करणे, कुठल्याही कामात दलालांना दलाली दिल्याशिवाय कामे होत नाहीत. दुय्यम निबंधक कार्यालयात येथे नकला काढणे दस्त नोंदणी शेत जमीन, घर जमीन इत्यादी विषयीची कामासाठी दलालांचा दबदबा आहे. दलाल आणि या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे धागेदोरे गुंतलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांची लूट एजंट, दलालामार्फत केली जात आहे. तहसील कार्यालयाच्या आवारातच हे दलाल आपले ठाण मांडून बसलेले असतात. कामाशिवाय दिवसभर या कार्यालयात बसणाऱ्या एजंट आणि दलालांची चौकशी प्रशासनाने करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. याबाबत लबडे यांनी तहसीलदार यांना लेखी तक्रार दिली आहे. लवकरात लवकर या दलालांचा बंदोबस्त प्रशासनाने करावा, अशी मागणी लबडे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या