अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी डॉ.शेख एजाज यांची नियुक्ती

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी डॉ.शेख एजाज यांची नियुक्ती

बीड जिल्हा प्रतिनिधी :- सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, संघटनात्मक चळवळीतील अग्रेसर व्यक्तीमत्व, बीड जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणारे, डॉ.शेख एजाज यांच्या कार्याची दखल घेऊन, अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे,संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदूरकर, राष्ट्रीय अध्यक्ष रमेश इंदूरकर, राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख शेषेराव सोपने मामा यांनी, डॉक्टर शेख एजाज यांची बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
बीड जिल्हाध्यक्ष मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी नियुक्तीपत्र दिले तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी नियुक्ती प्रित्यर्थ पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्यातील पोलीसांचे प्रश्न  तसेच व अडचणी समस्या आपण राज्यसरकारकडे मांडून  पोलिसांचे व महिला अधिकारी यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार, तसेच होतकरू व गरजू रुग्णांसाठी अल्प दरात वैद्यकीय सेवा देणार असे, नियुक्ती झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना डॉक्टर शेख एजाज यांनी सांगितले, त्यांच्या पुढील कार्यास पोलीस हक्क संरक्षक संघटनाचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदूरकर राष्ट्रीय अध्यक्ष रमेश इंदूरकर राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख शेषेराव सोपने मामा यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सलमान अन्सारी, न्यू सुंदर मेडिकलचे संचालक केमिस्ट अँड ड्रगिस्ट ठाकूर उमेश सिंह बुंदेले, सोहेल पठाण, शेख वासेख, शेख लईख, सय्यद अल्ताफ आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या