परिस्थिती मुळे साहित्य गुलदस्त्यात, लिखाणाचा छंद मात्र कायम.

परिस्थिती मुळे साहित्य गुलदस्त्यात, लिखाणाचा छंद मात्र कायम.
शोध बातमी :- ग्रामीण भागात खेड्यात जन्मलेले, पण जन्मजात साहित्य क्षेत्राची ओढ असलेले,श्री शेषराव मोहणाजी सोपणे मामा तांबुळगावकर यांनी बरेच साहित्य लिखाण केले आहे, कथा, पटकथा,कविता,जनजागृती गीतं,असे सर्व प्रकारचे साहित्य लिखाण केले, पण परिस्थिती मुळे, सर्व गुलदस्त्यातच राहिले,पण छंद मात्र कायम जोपासला.अशा गुमनाम सहितीकाच्या लेखणीतून जन्माला आलेली,व मातृदिनाच्या निमित्याने सहजपणे सुचलेली ही कविता, श्री शेषराव मोहणाजी सोपणे मामा हे कवी सविताकांत सोपणे या टोपणनावाने कविता करतात,कशी ही असो,आई किती मोठी आहे,किती सुंदर,निरागस व ममतेचं माहेर घर आहे, हे आपणाला या कवितेत पहायला मिळते.चला तर मग कविता ऐकू या.

कवितेच नावं आहे.

  आई



नको ते मेकअप नको ती सौंदर्य प्रसाधने काही.नको ते मेकअप, अन् नको ती सौंदर्य प्रसाधने काही ||
तरी किती शोभून दिसते माझी आई.
तरी किती शोभून दिसते माझी आई 
||धृo||

विस्कटलेल्या बटा.विसकटलेल्या बटा अन तो ठिगळाचा पदरं ||
तीच तर होती,तीच तर होती, मला जपणारी घेऊन कडेवर ||
नको ते मेकअप अन् नको ती सौंदर्य प्रसाधने काही.||
तरी किती शोभून दिसते माझी आई
||१||

अनवाणी पायाने, अनवाणी पायाने तुडवत असते रानं,||
पण लेकराच्या मायेपोटी,लेकरांच्या मायेपोटी,कष्ट करते बेभान||
नको ते मेकअप अन् नको ती सौंदर्य प्रसाधने काही ||
तरी किती शोभून दिसते माझी आई 
||२||

सारे तेहतीस कोटी देव,तेहतिस कोटी देव, अन् कमी पडतात चारीधाम ||
जेव्हा मस्तक ठेवतो आईच्या पायावर, तेव्हा वाटतो जीवाला आराम ||
नको ते मेकअप अन् नको ती सौंदर्य प्रसाधने काही ||
तरी किती शोभून दिसते माझी आई
 ||३||

माझी आई भोळी भाबडी,माझी आई भोळी भाबडी,मोकळ्या मनाची देवी || 
पदराच्या छायेखाली,पदराच्या छायेखाली,मला जपते ठाईठाई ||
नको ते मेकअप अन् नको ती सौंदर्य प्रसाधने काही ||
तरी किती शोभून दिसते माझी आई.तरी शोभून दिसते माझी आई 
||४||

कवी :- सविताकांत सोपणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या