भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य सचिव पदी देविदास राठोड यांची निवड झाल्याबद्दल पालम येथे सत्कार

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य सचिव पदी देविदास राठोड यांची निवड झाल्याबद्दल पालम येथे सत्कार

पालम तालुका प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य सचिव,माननीय श्री देवीदासजी राठोड साहेब,महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मरण स्थळी म्हणजे,गोपीनाथ गडावर दर्शनासाठी जात असताना,
पालम येथील सामाजिक,धार्मिक,राजकीय क्षेत्रातील तरुण तडफदार कार्यकर्ते, पांडुरंग रोकडे यांनी,भारतीय जनता पार्टी पालम तालुका कार्यकारिणीचे कार्यकर्त्यांना राठोड साहेब येत असल्याची माहिती दिली 
व नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य सचिव देविदासजी राठोड साहेब यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला, व सर्व कार्यकर्त्यांनी राठोड साहेब यांना पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी देविदासजी राठोड साहेब यांचा आजच वाढदिवस असल्या कारणास्तव,सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग रोकडे यांनी,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या,नंतर राठोड साहेब महाराष्ट्राचे लोकनेते यांच्या दर्शनासाठी गोपीनाथ गडाकडे रवाना झाले.
यावेळी रघुनाथ दुधाटे,पांडुरंग रोकडे,लिंबाजी टोले,शिवाजी दिवटे, मधुकर रोकडे, इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या