पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून शहराच्या विकास कामांना ११४ कोटींचा निधी मंजूर, संजय गाढवे यांची पत्रकार परिषदेत माहिती.

पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून शहराच्या विकास कामांना ११४ कोटींचा निधी मंजूर, संजय गाढवे यांची पत्रकार परिषदेत माहिती.

भूम तालुका प्रतिनिधि नवनाथ यादव :- आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्याकडून भूम शहरातील सिमेंट काँक्रिट रस्ते व नाली कामासाठी ११४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून ,
भुम शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. एवढा मोठा विकास निधी मंजूर होणे ही आपल्या शहरासाठी गौरवाची बाब असून आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे भुम शहर वाशियांच्या वतीने तसेच आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी व संजय गाढवे प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.या वेळी शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक संजय पवार, सुनील थोरात, संजय देवडीकर, माजी उपनगराध्यक्ष तौफिक कुरेशी, दत्तात्रय गायकवाड ,युवा नेते विशाल अंधारे, सुरज गाढवे, बालाजी अंधारे, संदीप  गाढवे, उपसरपंच दत्ता नलवडे, संजय नाना गाढवे प्रतिष्ठान, पदाधिकारी, मिञ परिवार, भूम शहरातील नागरीक, पत्रकार बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या