केरवाडीचे पोलीस पाटील सय्यद शादुल अमिरसाब यांना 'उत्कृष्ट पोलीस पाटील' पुरस्कार

 केरवाडीचे पोलीस पाटील सय्यद शादुल अमिरसाब यांना 'उत्कृष्ट पोलीस पाटील' पुरस्कार



पालम प्रतिनिधी :

पालम तालुक्यातील केरवाडी येथील पोलीस पाटील तथा पालम तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सय्यद शादुल अमिरसाब यांना जिल्हास्तरीय 'उत्कृष्ट पोलीस पाटील' पुरस्काराने गौरविण्यात आले.



परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण व पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथुर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे तसेच महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते.

ग्रामस्तरावर कायदा व सुव्यवस्था राखणे, प्रशासनाशी प्रभावी समन्वय साधणे आणि जनतेच्या सेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या मानाच्या पुरस्कारामुळे केरवाडी गावासह पालम तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, विविध सामाजिक, राजकीय व प्रशासकीय स्तरातून सय्यद शादुल अमिरसाब यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या