बोगस डॉक्टर वर कारवाई करा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा: यशवंत पवार यांचा इशारा

बोगस डॉक्टर वर कारवाई करा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा: यशवंत पवार यांचा इशारा

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :- रुग्णांच्या परवडत नाही व बोगस डॉक्टरांची फी जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसून वैद्यकीय शिक्षण नसतानाही अक्क्लकोट तालुक्यातील ग्रामीण भागात अनेके ठीकाणी तालुक्यात बोगस डॉक्टर बिनदिक्कतपणे अक्क्लकोट तालुक्यात रुग्णांवर उपचार करत आहेत. या बोगस व वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसलेल्या बोगस डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. मात्र तालुका वैद्यकीय अधिकरी अक्कलकोट यांच्याकडुन कारवाईचे पाऊल उचलले जात नाही. बोगस डॉक्टर अक्कलकोट तालुक्यात विविध भागात दवाखाने थाटून बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करत असून गोरगरिबांना तज्ञ डॉक्टरांची फी

कमी असल्याने रुग्णा उपचारासाठी या डॉक्टरांकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णांनाही कळत नाही. शिवाय रुग्ण हे डॉक्टरांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी जास्त चौकशी करत नाही. आरोग्य विभागाकडून सोलापूर शहरासह तालुक्यातील प्रत्येक डॉक्टरकडे चौकशी होत नसल्याने वर्षानुवर्षे बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करीत असल्याचे दिसून येते. अक्कलकोट तालुक्यात बोगस डॉक्टरांची मोठी डोकेदुखी वर्षानुवर्षे कायम असून बोगस डॉक्टरमुक्त तालुका करण्यासाठी आरोग्य विभागाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. तरी अक्कलकोट तालुक्यातील वैद्यकीय परवाना नसलेल्या बोगस डॉक्टर वर तात्काळ कारवाई करा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा असा इशारा ग्राहक कल्याण फौंडेशन चे सोलापूर जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी आरोग्य विभागाला दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या