पालम तालुका प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने गुरुवार दिनांक 06 एप्रिल2023 पालम शहरातील भव्य रॅली काढण्यात आली असता,रॅलीमध्ये पालम तालुक्यातील हिंदू धर्मीय समाज संघटना व समाज बांधव भाजप व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सावरकर प्रेमी यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेची रॅली टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आली,
रॅली भाजपा कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक,अहिल्याबाई होळकर चौक,शनिवार बाजार, या मार्गाने निघून,छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप झाला.समारोप प्रसंगी,मी सावकर या विषयावर अनेक मान्यवरांनी आपापली मते मांडली,
यात्रेमध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी व भारतीय जनता पार्टी स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,शिवसेना बजरंग दल विश्व हिंदू परिषद सर्व विश्व हिंदू परिषद सावरकरावर असंख्य प्रेम करणार्य संघटना उपस्थित होत्या

0 टिप्पण्या