रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवुन प्रमाण पत्र व भेट वस्तुचा लाभ घ्यावा असे सरपंच सौ.अंबिका जोतीराम क्षिरसागर यांनी आव्हान केले .
आनाळा प्रतीनिधी :- परंडा तालुक्यातील आनाळा नगरिचे ग्रामदैवत श्री कालीकादेवी यात्रा उत्सव दि. ८ वार शनिवारपासुन मोठया उत्साहात प्रारंभ होत असुन यात्रेनिम्मीत्त वेगवेगळ्या सांस्कृतीक कार्यक्रमासह विवीध धार्मीक क्रार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या बाबत माहीती अशी की, आनाळा नगरीचे ग्रामदैवत श्री कालीकादेवीचे जाग्रत देवस्थान आहे या देवीवर भावीकांची निस्सीम श्रध्दा आहे या देवीची यात्रा शनिवार पासुन सुरू होत असुन शनिवार रोजी संध्याकाळी ७.३० वाजता युवा प्रतीष्ठान जिजाऊ चौक यांच्या वतीने भव्य सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, पहाटे देवीस मानाचा अभिषेक,रविवारी सकाळी ८ वाजता भारत जाधव यांची मानाची कमान व चंद्रकांत चाफे यांचा घोडा देवीजीस अर्पण करण्यात येणार आहे. दिसभर विवीध मानाचे नैवध्य,दुपारी ३ वाजता बढ़ांन कार्यक्रम, संध्याकाळी ६ वाजता विवीध मंडळाची शेरणी निघणार आहेत. तर त्याच दिवशी संध्याकाळी १० वाजता देवीची छबिना निघणार आहे. दि.१० रोजी सकाळी ८ वाजता देवीच्या पालखीची मिरवणुक निघणार असुन दुपारी ११ वाजता गाववाल्यांच्या हजेरीने कार्यक्रमाची सांगता होईल.यात्रा काळातील सर्व धार्मीक , सांस्कृतीक कार्यक्रम शांततेत पार पाडण्याचे व यात्रेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीरा त रक्तदान करुन सहभाग नोंदवुन प्रमाण पत्र व आकर्षक भेट वस्तु चा लाभ घ्यावा आसे आव्हान सरपंच सौ. अंबिका जोतीराम क्षिरसागर यांनी केली .
0 टिप्पण्या