उद्योजक प्रमोदजी वाकोडकर यांचा सत्कार संपन्न

उद्योजक प्रमोदजी वाकोडकर यांचा सत्कार संपन्न
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघ चालक डॉ केशव हेगडेवार यांच्या जयंती निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण सरचिटणीस तथा भारतीय जनता उद्योग आघाडीचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकारणी सदस्य परभणी महानगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती श्री प्रमोद वाकोडकर यांनी प्रभाग 15 मध्ये मुक्या जनावरासाठी व गाय वासरे गोरे या जनावरासाठी पाण्याचे हौद जवळपास 50 ते 60 प्रत्येक नगरात किंवा प्रत्येक चौकात मध्ये त्यांच्या वतीने त्यांनी ठेवले आहे आणि तसेच वसमत रोड आर आर पेट्रोल पंप येथे त्याच्या पाण्याची पाणपोई उभारली आहे हे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा राष्ट्रजन प्राणीमित्र संरक्षण जनजागृती फाउंडेशन व वीर वारकरी सेवा संघातर्फे व्यंकटेश मंगल कार्यालय येथे दिनांक एक एप्रिल रोजी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समाजसेवक तथा संपादक संतोषराव धारासुरकर, प्रमुख पाहुणे जोशी कार्यक्रमाचे आयोजक प्राणी मित्र गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे अध्यक्ष )यांच्यावतीने त्यांचा हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार जल है तो कल है याप्रसंगी सत्कार करून स्वागत करण्यात आले अशी माहिती जलदूत नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या